बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी व मजूर जखमी

पोंभुर्णा : पोंभूर्णा वनपरिक्षेत्र अंतर्गत देवाडा बिटातील बोर्डा झुल्लूरवार शिवारातील सर्वे क्रमांक १७८ मधील शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेतकरी व शेतमजुरावर हल्ला चढवून गंभीर जखमी केले. ही घटना गुरूवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. काशिनाथ गावडे (५४) रा. बोर्डा झुल्लूरवार व वनमजूर मनोज गद्देकार (४०) रा. देवाडा खुर्द अशी जखमींची नावे आहेत.

काशिनाथ गावडे हे शेतात काम करीत होते. दरम्यान बिबट्याने हल्ला केल्याने ते गंभीर झाले. वनविभागाच्या पथकाला माहिती मिळताच वन अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन फटाके फोडले. बिबट्याला पडवून लावण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र चवताळलेल्या बिबट्याने रोजंदारीवर काम करणारे वनमजूर मनोज गद्देकार यांच्यावर हल्ला केला. यात ते जखमी झाले. दोघांनाही जखमींना ग्रामीण रुग्णालय पोंभूर्णा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. पुढील तपास वन परिक्षेत्राधिकारी फणिंद्र गादेवार करीत आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post