बुद्ध विहार बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन द्या आम कृष्णा गजबे यांचेकडे समाज बांधवांची मागणि

 

 देसाईगंज २८

 देसाईगंज येथिल जुनी वडसा वार्डातिल संबोधी बुद्ध विहाराचे बांधकाम हे निर्माणाधिन असुन या बुद्धविहाराचे बांधकामासाठी निधी उपलब्ध करुण देण्याची मागणी आमदार कृष्णाभाऊ गजबे यांना समाज बांधवांनी केली । मौजा जुनी वडसा येथे बौद्ध समाज बांधवांनी संबोधी बुद्धविहाराची निर्मिती केली माञ सदरचे बांधकाम अपुरे असल्याने समाज बांधवांना धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडणे अडचणिचे होते स्थानिक आमदार फंडातुन सदरचे बांधकाम पुर्ण केल्यास समाज बांधवांना सोयीचे होईल त्या करिता फंड उपलब्ध करुण द्यावा अशी मागणी बौद्ध समाजाचे दिपक सहारे मालता राऊत वंदना सहारे संध्या कर्हाडे रेखा गणविर समता खोब्रागडे मारोती जांभुळकर यांचेसह समाज बांधवांनी केली या प्रसंगी १० लक्ष रुपयाचा निधी सदर बांधकामासाठी उपलब्ध करुण देणार अशी ग्वाही आम गजबे यांनी दिली ।।

Post a Comment

Previous Post Next Post