आता बना मराठीतून मुन्नाभाई एमबीबीएस डॉक्टर...

आता वैद्यकीय शिक्षण मराठीतून घेता येणार; 'या' शाखांचा केला समावेश..*

👩🏻‍⚕️नुकताच वैद्यकीय अभ्यासक्रम हिंदीतून उपलब्ध करून देण्याचा निर्णय मध्य प्रदेश सरकारने घेतला होता. दरम्यान, मध्य प्रदेश नंतर आता महाराष्ट्रातही मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची महत्वपूर्ण माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजान यांनी दिली आहे.

👍🏼 राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मराठी भाषेत वैद्यकीय शिक्षण घेणे सोपे होणार असून 2023 या शैक्षणिक वर्षापासून ही सुविधा उपलब्ध असेल.

📝यामुळे आता *एमबीबीएससह आयुर्वेद, होमिओपॅथी, दंतचिकित्सा, नर्सिंग, फिजिओथेरपी यांसारखे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मराठीतून उपलब्ध* करून दिले जाणार आहेत. 2023 च्या शैक्षणिक 2वर्षांपासून हे अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध होतील. विशेष म्हणजे मराठीतून वैद्यकीयचे शिक्षण घेणं बंधनकारक राहणार नाही, ते ऐच्छिक असेल असेही यावेळी गिरीश महाजन यांनी सांगितले.

😇 ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा इंग्रजी बाबतचा न्यूनगंड दूर करावा यासाठी हा निर्णय घेतला. याबाबत समित्या नेमल्या असून पुढील शैक्षणिक वर्षांपासून हा निर्णय लागू करण्याता आमचा प्रयत्न आहे या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे, असेही महाजन म्हणाले आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post