हिम्मत करेल तोच जुगार जिंकेलं...? मालेवाडा येथील लहान बालकांना जुगार खेळण्याचे व्यसन.

चिमूर तालुक्या वरून सहा किमी अंतरावर मालेवाडा हे गाव आहे हा गाव चिमूर पोलीस स्टेशन अंतर्गत येतो.
प्रत्येक गावाला एक विशिष्ट ओळख असते आपल्या गावाला चांगली ओळख असावी अशी आशा सुज्ञ नागरिकांना असते, परंतु मालेवाडा या गावाला अनेक वाईट सवयीमुळे ओळखले जाते, गावठी दारूचे गाव अशी या गावची ओळख.
मालेवाडा येथे अक्षरशः गावठी दारू (मोहा) महापूर वाहत असून दहा ते वीस जण मोहा दारूची विक्री करतात, दारूच्या व्यसनामुळे या गावची युवक मंडळी गादर झाली असून अक्षरशः व्यसनेच्या आहारी गेली आहे. दारू विक्री बरोबर इथे जुगार सुद्धा मोठ्या प्रमाणात खेळला जातो शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांना जुगाराचे व्यसन लागले असून शाळेत न जाता ही मुले जुगार खेळत असतात जी मुले शाळेत जातात ती शाळेतून आल्यावर जुगार खेळतात. युवक मंडळी दारूच्या आहारी तर लहान बालके जुगाराच्या आहारी गेली आहेत. त्यामुळे येथील जुगार आणि दारू विक्री बंद झाली पाहिजे याकरिता पोलीस विभागाने जातीने लक्ष दिले पाहिजे मालेवाडा येथील बरबाद होणाऱ्या पिढीला पोलीस विभाग बाहेर काढेल काय...? आता हे पाहणे नित्याचे ठरेल.

Post a Comment

Previous Post Next Post