रावण दहनाच्या कार्यक्रमात मारहाण

 गोंदिया : तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम बोपेसर येथे रावण दहनाच्या कार्यक्रमात जुन्या वैमनस्यातून मारहाणीची घटना घडली. ग्राम बोपेसर येथे दोन गटांचा रावण दहनाच्या कार्यक्रम ५० मीटरच्या आवारात होता व यातील आरोपी पक्षाचा कार्यक्रम संपल्यानंतर फिर्यादीचा कार्यक्रम सुरू असताना आरोपींनी नाचता नाचता जुन्या वैमनस्यातून जमाव करून फिर्यादीला थापडबुक्क्यांनी मारहाण सुरू केली.

हे बघून फिर्यादीचे दोघे भाऊ भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही थापडबुक्क्यांनी मारहाण केली. ५ ऑक्टोबर रोजी रात्री ७.३० वाजता दरम्यान घडलेल्या या घटनेत पोलिसांनी फिर्यादी मंगेश छबीलाल राणे (२९, रा. बोपेसर) यांच्या तक्रारीवरून भादंवि कलम १४३, १४७, १४९, ३२३ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post