कोंबड्या चोरापासून सावधान व्हा... कोंबड्या चोराने केले हजारो रुपयाचे कोंबडे लंपास

गोंडपीपरी :- तालूक्यातील नागरीकाचा शेती हा मुख्य
व्यवसाय आहे. येथील नागरिक शेतीवरच उपजीविका भागवितात.

कधी ओला तर कधी सुका दुष्काळ यासारख्या संकटाचा सामना येथील शेतकऱ्यांना करावा लागतो आहे.

यंदा तब्बल पाच वेळा नद्यांना पुर आला. गोंडपीपरी तालुक्यातिल शेतकरी पुरता हादरला. पुराचा जबर फटका शेतपिकांना बसला.

खरीप हंगामात लागवड केलेले पीक पूराच्या पाण्यात
वाहून गेले.दोन-तीनदा पेरणी केलेले हे शेत जुन्या पिकाने गिळंकृत केले आहे केली.

दरवर्षी होणारे शेतपिकांचे नुकसान पाहता बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतीला जोड धंदा म्हणून मत्स्य व्यवसाय तसेच कुकुडपालन व्यवसाय सुरू केला."

काहींनी शेतातच शेततळे खोदून मत्स्यपालन्
तर काहींनी कुकुडपालन व्यवसाय सुरू केलतशी व्यवस्था उभारली.

अश्यातच चोरट्याने अंधाऱ्या रात्रिचा फायदा घेत चक्क शेतातून महागडे कोंबडे चोरून नेले. त्यामुळे शेत नुकसान झाले आहे.


गोंडपीपरी तालुक्यातील नांदगाव येथील 27 वर्षीय युवा शेतकऱ्यांने शेतीसोबतच कुकुडपालन व्यवसाय करण्याचे ठरविलं.

नफ्याचा दृष्टीकोन बाळगून विविध जातीचे महागडे कोंबडी चे पिलू विकत घेतले. चारा-पाणी यासह योग्य वातावरनात त्यांना वाढवल.ते आता परिपक्व झाले आहेत. काही कोंबडे तर तीन किलोच्या वर झाले. एकेक कोंबड्या ची किंमत तीन ते चार हजार होते.

दिवाळीच्या पाडव्याच्या वेळी

परिपक्व झालेले कोंबडे विकन्याच्या बेतात असतानाच अंधाऱ्या रात्रीचा फायदा घेत शेत गाठून चोरट्याने चक्क महागडे कोंबडे चोरले.

सकाळच्या सुमारास शेतकरी शेतात गेले असता महागडे कोंबडे चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.

शेतातुन कोंबडे चोरीस गेल्याने शेतकऱ्यांचे हजारोचे नुकसान झाले.

Post a Comment

Previous Post Next Post