सर्पदंशाने महिलेचा मृत्यू


मूल :- येथील वॉर्ड नं. ७ मधील रहिवासी माया दिलीप चिताडे (५०) ही महिला आपल्या शेतात निंदण करीत असताना विषारी सापाने दंश केला. लगेच त्यांना मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. ही घटना शनिवारी घडली.

मूलच्या उमा नदीजवळील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post