पोलीस पोलीस भरती पूर्वतयारी साठी केशोरी येथील तरुण झाले सज्ज


गणेश काडगाये प्रतिनिधि

केशोरी:- नंदकुमार पाटील गहाणे सरपंच केशोरी यांच्या संकल्पनेतून त्याच बरोबर केशरी पोलीस स्टेशन यांच्या पुढाकारातून केशरी नगरीतील केशरी ते साकोली च्या मुख्यमार्गाजवळ तलावा जवळ मुलांना धावण्यासाठी ट्रॅक व ग्राउंड सज्ज करण्यात आला ग्राउंडवर जवळपास 100 ते 150 युवक युवती मोठ्या संख्येने प्रशिक्षण घेत आहेत केसरी नव्हे तर जवळपासचे सर्व मुले मुली सायंकाळी चार ते सहा वाजेपर्यंत प्रशिक्षण घेत आहेत केसरी हा परिसर तसा नक्षलग्रस्त व आदिवासी बहुल भाग असून या परिसरात आजपर्यंत अशा प्रकारचे व्यवस्था नसल्याने रोजगाराची संधी उपलब्ध होत नव्हती त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे व या कामाकरिता सर्व स्तरावरून प्रशंशा करण्यात येत आहे त्याचबरोबर याकरिता पोलीस स्टेशन केशरी च्या वतीने दोन कॉन्स्ट कॉन्स्टेबल संदीप शिवरकर व रामटेकेजी यांची प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली त्यांच्या साथीला गावातील नेहमी समाज कार्य करणारे संजू भाऊ वलथरे प्राध्यापक हे सुद्धा मोठे हिरहिरीने काम करीत आहेत

Post a Comment

Previous Post Next Post