साथीचे आजार नियत्रंणात आणण्यासाठी धुरीकरण अभियान राबवा पांडुरंग आमले यांची मागणी.


विरेंद्र म्हात्रे उपसंपादक नवी मुंबई : प्रभाग ३० मधील साथीचे आजार नियत्रंणात आणण्यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत भागात धुरीकरण अभियान राबविण्याची लेखी मागणी सानपाडा नोडमधील भाजपचे युवा नेते तसेच समाजसेवक पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे एका निवेदनातून केली आहे.

दसरा गेला, आता दिवाळी अवघ्या १५ दिवसावर आलेली आहे. प्रभाग ३० मध्ये डासांचा त्रास वाढीस लागला आहे. साथीच्या आजाराचेही रुग्ण वाढीस लागले आहेत. पावसाने आता उघडीप घेतली आहे. डास नियत्रंणासाठी पालिका प्रशासनाने व्यापक मोहीम हाती घेणे आवश्यक आहे अन्यथा साथीच्या आजाराचा उद्रेक होण्याची भीती आहे. प्रभाग ३० मध्ये डासांचा उद्रेक संपुष्ठात आणण्यासाठी व साथीच्या आजारावर नियत्रंण आणण्यासाठी सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर २,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११, १२, १५, १६, १६ ए, १७, १८, १९, २०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसरात अंर्तगत व बाह्य परिसरात तसेच संबंधित भागातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात धुरीकरण अभियान तातडीने राबविण्याची गरज असल्याचे पांडुरंग आमले यांनी निवेदनात म्हटले आहे.

प्रभाग ३० मध्ये सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर २,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११,१२, १५, १६, १६ ए, १७, १८, १९, २०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसराचा समावेश होत आहे. या परिसरात डासांचा उद्रेक वाढीस लागल्याने स्थानिक रहीवाशी त्रस्त झाले आहेत. डासांचा उद्रेक वाढल्याने स्थानिक परिसरात साथीचे आजार वाढीस लागले असून साथीच्या आजारांचा स्फोट होण्याची भीती आहे. मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांचेही प्रमाण वाढीस लागले आहे. डासांमुळे सार्वजनिक ठिकाणी, इमारतीच्या तळमजल्यावर, उद्यानातही लोकांना फिरणे अवघड झाले आहे. प्रभाग ३० मधील सर्वच गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारामध्ये व बाहेरील भागात डासांचा उद्रेक नियत्रंणात आणण्यासाठी धुरीकरण अभियान राबविण्यासाठी संबंधितांना निर्देश देवून सानपाडावासियांना दिलासा देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post