पत्नीने रात्री पतीवर धारदार शस्त्राने वार करत त्याला संपवून टाकलं, इतंकच नाहीतर तिने आपल्याच पतीचं गुप्तांगही कापून टाकलं.

भिलाई :- पती-पत्नीची भांडणं काही नवीन नाही, मात्र एका महिलेने तिच्याच पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी पत्नीला तिचा पती रंगावरून चिडवत घालून पाडून बोलत असायचा. काहीवेळा तिला मारहाणही करायचा आणि घराबाहेर काढण्याची धमकी देत असायचा त्यामुळे पत्नी वैतागून गेली होती. 

महिलेच्या पतीने रविवारी रात्री तिला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि तिला काळी-काळी म्हणत बाहेर काढायचा प्रयत्न केला. पतीच्या या कृत्याचा त्याच्या पत्नीला राग आला होता. पत्नीने रात्री पतीवर धारदार शस्त्राने वार करत त्याला संपवून टाकलं, इतंकच नाहीतर तिने आपल्याच पतीचं गुप्तांगही कापून टाकलं. (Wife cuts her husbands private part)

पत्नीने हत्या करताना वापरलेलं शस्त्र अंगणातील विहिरीमध्ये टाकून दिलं. रक्ताने माखलेली साडी ही पलंगाखाली लपवून ठेवली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यावर हत्या असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. शेजारी विचारपूस केल्यावर पोलिसांना पत्नीवर संशय आला.

पोलिसांनी पत्नीची विचारपूस केल्यावर तिने आपला गुन्हा कबुल केला. पती आपल्याला काळी-काळी बोलत असायचा, त्यामुळे रागामध्ये त्याला संपवून टाकल्याचं पत्नीने पोलिसांना सांगितलं. त्यानंतर तिच्यावर गुन्हा दाखल करत पोलिसांनी अटक केली आहे. छत्तीसगडमधील भिलाई इथली ही घटना आहे.

Post a Comment

Previous Post Next Post