वरुड नागपूर रोडवर चालतात अवैध वाहतूक



1) अवैध प्रवासी वाहतूक तात्काळ थांबवा 

2) पासेस परमिट प्रवासी वाहतूक गाड्याना प्राधान्य द्या.

राजेंद्र बागडे नागपूर जिल्हा विभागीय प्रतिनिधी ता 17

           वरुड जलालखेडा नागपूर रोडवर चालणाऱ्या अवैध प्रवासी वाहतूक गाड्या चालतात यावर कोणत्याही आरटीओ परिवहन अधिकाऱ्यांचे हेतूपुरस्सर दुर्लक्ष होत असून बेकायदेशीर पैसे वसूल करून त्या अवैध वाहतूकीला चालना दिल्या जातात या नियमाचे उल्लंघन होत असून अवैध वाहतूक ज्याच्याकडे परमिट व पासेस नाही लायसन्स नाही अश्या गाड्या नियमाचे उल्लंघन करून या रोडवर गाड्याचा सुळसुळाट चालतात त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे या अवैध प्रवासी वाहतूक पासून पोलीस काही आर्थिक साटेलोटे करून या अवैध गाड्याना मुभा देतात. त्यामुळे पासेस परमिट प्रवासी गाड्या मालकाचे आर्थिक नुकसान होत आहे ज्या परमिट प्रवासी गाड्या आहे त्याना आर्थिक भुर्दंड सहन करून गाड्या चालवावे लागते शासनाने अशा अवैध वाहतूक प्रवासी गाड्या बंद करावे.अशी मागणी परमिट पासेस लायसन्स असणाऱ्या गाड्या मालकांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post