अतिदुर्गम पेंढरी येथील आदिवासी विकास सहकारी संस्थेला धान खरेदीची परवानगी द्या*



*अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा पेंढरी परिसरातील शेतकऱ्यांचा प्रशासनाला इशारा*

*आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना दिले निवेदन*

*निवेदनकर्त्या शेतकऱ्यांच्या समोरच साधला जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद*

*दिनांक १७/१०/२०२२ गडचिरोली*

धानोरा :- सन २०१८ मध्ये आदिवासी विकास सहकारी संस्थेला धान खरेदी मध्ये आलेल्या तुटीचा ठपका ठेवून अजून पर्यंत धान खरेदी विक्री करण्यास परवानगी न देणे हे या परिसरातील शेतकऱ्यांना नाहक मानसीक व आर्थिक त्रास देणे आहे. त्यामुळें अतिदुर्गम पेंढरी येथील आदिवासी विकास सहकारी संस्थेला धान खरेदीची परवानगी देण्यात यावी अशी मागणी आमदार डॉ देवरावजी होळी यांच्याकडे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तथा शेतकऱ्यांनी निवेदाद्वारे केली*

*यावेळी निवेदन देताना माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास दुलमवार , संस्थेचे अध्यक्ष रुपेंद्र नाईक, उपाध्यक्ष छबलाल बेसरा, संचालक डोमा लेनगुरे, रामभाऊ नाईक ,रघुनाथ कोटवार , लक्ष्मण राणा, संजय गावडे ,राजू जावडे, रत्नाकर मडावी ,सचिव लोकेश मडावी, सदाशिव बोरुले यांचे सह स्थानिक शेतकरी व संस्थेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते उपस्थित होते*

*आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था पेंढरी येथे २०१८-१९ मध्ये झालेल्या त्रुटी व अपहाराबद्दल संस्थेच्या कर्मचाऱ्यांवर व संचालकावर संबंधित दोषींवर कारवाई सुरू आहे. मात्र ५ वर्ष होऊन देखील त्याच कारवाईच्या नावावर हजारो शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी इतर संस्थेकडे वळविण्यात आली आहे. परिणामी शेतकऱ्यांना आपले धान व्यापाऱ्यांना स्वस्त भावामध्ये विकावे लागत आहे .त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे या सर्व बाबी लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने या संस्थेला धान खरेदीची परवानगी देण्यात यावी. अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व परिसरातील शेतकऱ्यांनी केली.*

*निवेदन मिळतात आमदार महोदयांनी जिल्हाधिकारी यांच्याशी फोन वरून संपर्क साधून सदर संस्थेला धान खरेदीची परवानगी तातडीने देण्याबाबत निर्देशित करावे याबाबत चर्चा केली*

 *मागणी मंजूर न झाल्यास या भागातील कास्तकार रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशाराही त्यांनी या माध्यमातून दिला आहे.*

Post a Comment

Previous Post Next Post