चोर असा कसा सापडत नाही... सापडल्याशिवाय राहत नाही


आरमोरी:- दिनांक 12/10 /2022 रोजी मौजा-बर्डी आरमोरी, जि. गडचिरोली येथील शिक्षक दाम्पत्याने पोस्टे आरमोरी येथे तक्रार दिली की, ते दोघे पती पत्नी घरी हजर नसताना त्यांचे राहते घरी दुपारी 11:30 वा ते 14:30 वा. दरम्यान मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात घूसून आलमारीत ठेवलेले जूने वापरते 30 ग्रॅम वजनाचे अंदाजे किंमत 90000 / रू. सोन्याचे दागीने व रोख रक्कम 22000 / रू. असा एकूण 1,12,000 / रू. चा माल अज्ञात इसमाने चोरून नेले बाबतची तकार दिल्याने पोस्टे आरमोरी अप. कं. 413 / 2022 कलम 380, 454 भा.द.वि अन्वये गुन्हा नोंद करून पुढील तपास मा. पोलिस अधिक्षक श्री. अंकित गोयल, प्रभारी पोलिस अधिक्षक श्री. सोमय मुंढे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रणिल गिल्डा, पो. नि. श्री. मनोज काळबांडे यांचे मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री. ग. शिंदे हया करीत आहेत. मपोउपनि शिंदे यांनी तपासचे चक्र फिरवून अवघ्या 03 दिवसात चोरीच्या प्रकरणचा छडा लावत 1 ) अस्लम अजुमउल्ला शहा 2) शाहिदअली हमीदअल्ली शहा दोघेही रा. उत्तर प्रदेश या दोन आरोपीतांना अटक केले




 मा. न्यायालयाने सदर आरोपीस दि. 17/10/2022 ते 20/10/2022 रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केला असून नमूद आरोपीकडून आज दि. 19/10/2022 रोजी चोरी गेलेल्या मालापैकी 43000/रू. किंमतीचा सोन्याचा मुद्देमाल व नगदी 2000 / रू. असा एकूण 45,000/ रू. चा मुद्देमाल आरोपीने काढून दिले प्रमाणे जप्त करण्यात आला आहे. तसेच यादरम्यान मोटार सायकल चोरीच्या गुन्हयात आरमोरी पोलिसांना पाहिजे असलेला शातीर आरोपी विकास शर्मा याला सुद्धा अटक करण्यात आले होते. विकास शर्मा यांने 03 मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिलेली आहे. शिक्षक दाम्पत्यांच्या घरी झालेल्या चोरीच्या गुन्हयाचा तपास मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मपोउपनि शिंदे करत असून या तपासातून आणखी चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. मपोउपनि शिंदे यांना सदर गुन्हयाच्या तपासात पोउपनि संभाजी झिंजुर्डे, पोहवा / 2241 उराडे, पोहवा / 1858 वऱ्हाडे, पोना / 2872 जाधव, पोशि/ 5440 ढोरे, पोशि/ 3489 बांबोळे व इतर अंमलदार सहकार्य करत आहे.


Post a Comment

Previous Post Next Post