अपघातात निवृत्त पोलीस उपनिरीक्षक ठार; २ जखमी



 मूल : चंद्रपूर मार्गावरील आगडीजवळ ट्रक व कारची समोरासमोर धडक झाल्याने निवृत्त पोलीस उपनिरीक्षक जागीच ठार झाले, तर दोनजण गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी सकाळी ११.३० वाजता घडली.

माणिक दशरथ कुमरे (६०, रा. मूल) असे अपघातात ठार झालेल्या निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. त्यांची पत्नी शालिनी माणिक कुमरे (५०, रा. मूल) व चालक हेमंत मेश्राम (रा. मारोडा) हे गंभीर जखमी आहेत. बंगळुरूहून चंद्रपूर मूल मार्गाने चालक किसन पटेल (२२) गाडीने (क्रमांक सीजी ०८ एटी ०७६९) रायपूर येथे जात होता. मूलवरून चंद्रपूरला खासगी कामाकरिता निवृत्त पोलीस निरीक्षक पत्नीला घेऊन खासगी गाडी करून (क्र. एमएच ३१ डीके २३५०) जात असताना धडक होऊन माणिक यांचा जागीच मृत्यू झाला.

Post a Comment

Previous Post Next Post