वैरागड येथील आंबेडकर चौकातील नागरिकांनी अडवली नळ पाईप लाईन.

- लहान पाईप टाकण्यात येत होते.
- पाईप निकृष्ट दर्जाचे असून कामात गैर व्यवहार.
- आंबेडकर चौकातील नागरिकांची मागणी.


वैरागड : - गावात जल सवर्धन योजने अंतर्गत नवीन नळ पाईप लाईन टाकण्यात येत होते. टाकण्यात येणारे पाईप लहान आकाराचे आणि निकृष्ट दर्जाचे असल्याने येथील आंबेडकर चौकातील नागरिकांनी दि. १३ ऑक्टों. रोजी संध्याकाळी अडवली नळ पाईप लाईन.

गावातील प्रत्येक वॉर्डातील नागरिकांना नळाच्या पिण्याचे पाणी मिळावे यासाठी ग्राम पंचायतच्या माध्यमातून कंत्राटद्रारा जल सवर्धन योजने अंतर्गत गोरजाई डोह पासून प्रत्येक वॉर्डांत जे.सी.पी. द्रारे रस्ता खोदून समान अंतराने नवीन नळ पाईप लाईन टाकण्यात येत आहे. मुख्य रस्त्याने मोठे पाईप तर अंतर्गत गल्लीतील नळाला लहान पाईप टाकण्याचे असून सुद्धा मुख्य रस्त्यावर लहान पाईप टाकण्यात येत असल्याने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वॉर्डातील नागरिकांनी एकत्र येऊन वॉर्डातील राजेश खोब्रागडे यांच्या घराजवळ टाकत येत असलेली पाईप लाईन अडवली.


पाईप लाईन अडविल्याची माहिती मिळताच ग्राम पंचायत सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी नागरिकांशी चर्चा करून समजविण्याचे प्रयत्न केले. परंतु नागरिक आपल्या मतावर ठाम राहून पाईप मोठी टाकण्यात यावी आणि उच्च प्रतीचे पाईप टाकण्यात यावे अशी मागणी केली. तसेच या कामात गैर व्यवहार होत आहे याची चौकशी करण्यात यावी अशी सुद्धा मागणी यावेळी करण्यात आली. कंत्राटदार आल्यानंतर समोरील पाईप लाईन टाकण्याचे सांगून काम बंद करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post