गतिरोधकावरून दुचाकी उसळली, इसमाचा मृत्यू

 धानोरा : धानोरा ते रांगी मार्गावरील खेडी येथे गतिरोधकावर दुचाकी उसळल्याने मागे बसलेला एक इसम खाली पडून त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना २५ ऑक्टोबरच्या रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.

तुळशीदास चचाणे (५० वर्ष) रा. कन्हाळगाव, तालुका लाखनी, जिल्हा भंडारा असे मृताचे नाव आहे. दोन इसम आपल्या गावावरून दुचाकीने धानोरा तालुक्यातील मोहली येथे कामानिमित्त जात होते.

रांगीमार्गे ते मोहलीकडे जात असताना खेडी येथे गतिरोधकावरून त्यांची दुचाकी उसळली. त्यामुळे दुचाकीवर मागे बसलेले चचाणे खाली पडले. त्यांना रांगी येथील दवाखान्यात नेण्यात आले. तेथून ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे रेफर करण्यात आले; पण रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास धानोरा पोलीस करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post