सांग ! मत देऊ कुणाला ? जळगाव विकून खाल्ले.

सांग ! मत देऊ कुणाला?

भाजपची सत्ता दिर्घकाळ राहिली.निरंकुश होऊ लागली.आधी विरोधकांना चीत केले.नंतर स्वपक्षातील लोकांना.नंतर आम्ही जनतेला.विरोधक नामोहरम झाले.स्वपक्षीय जुनी भांडीसारखे वसारले गेले.उरलो आम्ही जनता.आमचे आर्थिक शोषण सुरू केले.नोटबंदी,जीएसटी,टोल टैक्स,मनी ट्रान्सफर टैक्स.अल्लाउदीन खिलजी किंवा औरंगजेबाच्या काळातील कोणी आहे का, पुनर्जन्म घेऊन आलेला? ज्याने सांगावे,झिजीया कर जास्त होता कि भाजप कर जास्त आहे?मोदींनी रडण्याची संधी दिली नाही.तक्रारीला जागा ठेवली नाही.इडी,कोर्ट,पीएमएलए, निवडणूक आयोग सर्वच एकहाती घेऊन जनतेचे अधिकार नजरकैदेत ठेवले.बॅंकेत पैसे ठेवा.म्हणे झिरो बॅलन्स.नाही.आता तर मिनीमम बॅलन्स पाहिजे.नाहीतर टॅक्स.ठेवले पैसे.ठेवले नाही, अडकवले.गुंतवणुक आता फसवणूक वाटते. धनदांडग्यांना भरमसाठ कर्ज देऊन ते पळाले.दारूवाला,बुकीवाला,हवाला.इतकी संपत्ती इंग्रजांनी सुद्धा पळवली नसेल.जनतेचा खिसा कापून ठरावीक चोर करोडपती ,अब्जोपती झाले.काही परदेशी पळाले.काही गाठोडी बांधत आहेत.खिसा कापला चोरांनी पण चाकू मात्र सरकारचा आहे.हा चाकू जास्त धारदार होत चालला आहे.
राजाला राजा शह देऊ शकतो.राजाला राजा मात देऊ शकतो.राजकिय पक्षाला राजकीय पक्ष मात देऊ शकतो.पण कोणी पक्ष शिल्लक राहिला नाही.सरदार पक्ष होते, त्यांना सुद्धा जेरीस आणले.मांडलिक व्हा ,नाहीतर जेलमध्ये जा.बडे बडे तिसमारखा सलाम ठोकून तंबूत गेले.नाही गेले ते खरेदी केलेत.महाराष्ट्रात खोका कांड प्रसिद्ध झाले.ते गुवाहाटी टुर मूळे.पण असेच खोका कांड पांच राज्यात झाले.काय पाहिजे? पेटी कि खोका ? आणि खोका पाहून बोका पळाला तिकडे.हे विदारक चित्र आहे.याला राजकारण म्हणता येणार नाही.
एकमेव विरोधक आहेत कांग्रेस. राहूल गांधी आता मैदानात उतरले.रस्त्यावर उतरले. भारत जोडो.लोकांना आशा वाटू लागली.लोक चालू लागले.आम्ही आहोत सोबतीला.मलाही वाटले आपण कांग्रेस ला मत द्यावे.भाजपच्या मतदारालाही वाटू लागले ,आता कांग्रेस ला मत द्यावे.आडवाणी,मुरली मनोहर जोशी, गडकरी सुद्धा.
मी जळगाव जिल्ह्यातील मतदार आहे.मी जळगाव लोकसभा उमेदवाराला मतदान करू शकतो.मी जळगाव शहर विधानसभा उमेदवाराला मतदान करू शकतो.सरळ राहूल गांधींना नाही.म्हणून मला येथे कांग्रेस चा नेता हवा.कांग्रेसचा उमेदवार हवा.पण नाही.अंधार आहे.सामसूम आहे.कोणीच नाही.जो माझा प्रश्न रस्ता,पाणी ,वीज,गटार,शिक्षण, आरोग्य ,शेती ची समस्या ऐकून घेईल.ही कांग्रेस संघटनेची विकलांगता आहे.येथे कांग्रेस संघटना हैण्डीकैप झाली आहे.समोर कोणी उमेदवार नसेल,भाजपला पर्याय नसेल तर मला प्रश्न पडतो.सांग,मत देऊ कुणाला?
महाराष्ट्रात कांग्रेस चे ४४ आमदार आहेत.पैकी कोणीही नेता नाही.ते संस्थानिक आहेत.त्यांच्या आर्थिक, शैक्षणिक संस्था आहेत.त्यातील नोकर दिड दोन लाख आहेत.ते हक्काचे मतदार आहेत.बंधुआ मजदूर आहेत.जातील कुठे?कधी गेले तर उद्याच रस्त्यावर येतील.त्यापेक्षा मालकाला मत देऊन मोकळे.हे मालक आमदार झाले काय किंवा खासदार झाले काय? फक्त डोकी वाढवतात.पक्ष वाढवत नाहीत.हे सरदार कांग्रेस चे लेबल लावत असतील पण मांडलिक भाजपचे आहेत.त्यांची अगतिकता आहे.इडीची भीती आहे.
आधी कांग्रेस गांधीजी , नेहरूजी,शास्रीजी ,विनोबाजींची होती.ती आता संस्थानिकांची झाली आहे.येथे कोणीही गांधी,नेहरू,शास्री,विनोबा नाहीत.जे घरदार सोडून जनेतची सेवा करतील,वर मान करून बोलतील.जर कोणी निर्धन माणसाला येथे स्थान नाही.येथे पाहिजे शाळा, कॉलेज, कारखाना,पतपेढी,बार.वैध ,अवैध धंदे.हे धंदे शाबूत ठेवण्यासाठी इडी देवतेची अवकृपा नको.हे गेले शरण.म्हणून कांग्रेसला मरण.
भारतीय लोकशाही ही प्रतिनिधीक स्वरूपाची आहे.मी राहूल गांधींना स्विकारले तरी मला माझा विधानसभा प्रतिनिधी हवा आहे.जो विधानसभेत माझा प्रश्न मांडतो.मला माझा लोकसभा प्रतिनिधी हवा आहे.जो लोकसभेत माझा प्रश्न मांडतो.असा प्रतिनिधी येथे नाही.म्हणून मला प्रश्न पडतो.सांग!मत देऊ कुणाला?
राहूल गांधींची भारत जोडो यात्रा चालू आहे.यात्रा म्हणजे जत्रा आहे.गर्दी आहे.जशी खंडोबाची जत्रा.मरीमाय ची जत्रा.या, जा ,खा ,प्या, आनंद घ्या, निघून जा.ही यात्रा राजकीय झाली पाहिजे.वाटेवरील लोकांची समस्या जाणणारी हवी आहे.समस्यांवर उत्तर शोधणारी हवी आहे.करमणुक नको,सोडवणुक हवी आहे.मला माझी समस्या सोडवणारा नेता हवा आहे.ज्याला मी आमदार निवडून देऊ शकतो.ज्याला मी खासदार निवडून देऊ शकतो.तो नाही.म्हणून विचारतो.सांग!मत देऊ कुणाला?

... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव.

Post a Comment

Previous Post Next Post