उपपोस्टे झिंगानुर येथे व्हालीबाल स्पर्धा संपन्न*

*उपपोस्टे झिंगानुर येथे व्हालीबाल स्पर्धा संपन्न* 



रवि बारसागंडी सिरोचा तालुका प्रतिनिधि 


            आज रोजी उप पोलिस स्टेशन झिंगानुर येथे मा.पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल सा., मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनुज तारे सर यांच्या संकल्पनेतून व मा. SDPO श्री सुहास शिंदे सा. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून * भव्य भगवान बिरसा मुंडा व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.*
       सदर कार्यक्रमाचे उदघाटन सौ.निलीमाताई कारे मडावी सरपंच( झिंगानुर) श्री कारे मडावी ग्रा.प.सदस्य, प्रतिष्ठित नागरिक श्री शंकर मडावी, श्री मारा आत्राम , पोउपनि.देविदास झुंगे प्रभारी अधिकारी उपपोस्टे झिंगानुर, पोउपनि उदय पाटील,पोउपनि राहुल घुले,या.रा.पो.बल गट धुळे चे पोउपनि जायभाय, पोउपनि केकान यांनी केले. सदर स्पर्धेची सुरूवात भगवान बिरसा मुंडा यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन करण्यात आली. मान्यवरांनी खेळ व खेळांचे महत्त्व सांगून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.       


                  सदर व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेकरिता हद्दीतील *एकूण ०८ व्हॉलीबॉल संघांनी* उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. स्पर्धेकरिता खेळाडू व प्रेक्षक असे १०० ते १५० नागरिक उपस्थित होते. प्रत्येक संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. त्या मधून प्रथम क्रमांक गोंटादेवि संघ झिंगानुर माल, द्वितीय क्रमांक- वीर बाबुराव सेडमाके संघ ,झिंगानुर चेक व तृतीय क्रमांक बिरसा मुंडा संघाने पटकावला. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक याविजेत्या संघांना अनुक्रमे 3000/- रू,2000/- रू व 1000/- रू. रोख पारितोषिक देण्यात आले. 
          तसेच उपस्थित खेळाडूंना उपविभागीय स्तरावर आयोजित होणाऱ्या स्पर्धां बाबत व अतिसंवेदनशील नक्षल प्रभावित भागातील खेडाळु यांच्या अंगी असलेले सुप्त गुण दाखविण्यासाठी योग्य ती संधी आपल्याला गडचिरोली पोलीस दल देत आहे याचा आपण सर्व खेडाळुनी लाभ घ्यावा असे मार्गदर्शन पोउपनि देविदास झुंगे यांनी केले तर उपस्थितांचे आभार पोउपनि राहुल घुले यांनी मानले 
   सदर स्पर्धेला हद्दीतील नागरिकांनी अभतपूर्व सहभाग नोंदवून सदर स्पर्धा आयोजित केले बाबत गडचिरोली पोलिस दलाचे आभार मानले.
सदर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सिव्हिक टिम झिंगानुर चे पोशि/५४६५ शिवप्रसाद करमे,पोशि/५३७० भगवान वाघ तसेच पोस्टचे अंमलदार आणि SRPF चे अंमलदार व अधिकारी यांनी अथक परिश्रम केले.
सदर स्पर्धेत सहभागी खेडाळु व उपस्थित नागरिक यांना अल्पोपहार ची व्यवस्था करण्यात येवून स्पर्धा संपन्न करण्यात आली

Post a Comment

Previous Post Next Post