संविधान दिनाचे औचित्य साधून कराटे स्पर्धेत जिल्हा व विभागीय स्तरावर निवड झालेल्या विद्यार्थिनींचा युवारंग तर्फे सत्कार.*



*युवारंग तर्फे आयोजित निशुल्क कराटे प्रशिक्षण जिल्ह्यातील गावागावात पोहोचविणार :- राहुल जुआरे*


आरमोरी :-   दि.२२ नोव्हेंबर २०२२ ला आरमोरी क्रीडा संकुल येथे कराटे स्पर्धेत आयोजन करण्यात आले होते सदर कराटे स्पर्धेत युवारंग द्वारा संचालित राजमाता जिजाऊ शक्ती कराटे ग्रुप ,आरमोरी च्या निशुल्क कराटे प्रशिक्षणातील विद्यार्थिनींची जिल्हा व विभागीय स्तरावर निवड  झाली ज्यामध्ये प्रज्ञा सुरेश म्हशाखेत्री,प्राची पितांबर राऊत ,गौरी  देवेंद्र वणीकर ,पलक सुनिल हिरापुरे ,गुंजन गायकवाड खोब्रागडे सुहानी नरेश नवघरे यांची जिल्हास्तरीय तर स्वाती भास्कर चिलबुले , आयुषी सुनिल हिरापुरे यांची विभागीय स्तरावर निवड झाली निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा आज दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ ला दुपारी १:३० वाजता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वाचनालय इंदिरानगर बर्डी, आरमोरी येथे सत्कार करण्यात आले याप्रसंगी या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आरमोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.मनोजजी काळबांडे साहेब तर प्रमुख अतिथी म्हणून युवारंग चे संस्थापक तथा अध्यक्ष मा.राहुलजी जुआरे , राजमाता जिजाऊ शक्ती कराटे ग्रुप चे मुख्य कराटे प्रशिक्षक मा. राजुजी घाटुरकर व सहप्रशिक्षक मा.राजूजी अतकरे सर उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.काळबांडे साहेब यांनी विद्यार्थ्यांना बहुमूल्य मुलाचे मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात महापुरुषांचे विचार आत्मसात करून आचरणात आणावे व समाजाला आपले देणे आहे याचे भान ठेवून सामाजिक कार्यात सहकार्य करावे युवारंग हे महापुरुषांचे विचार जपणारे संघटन आहे युवारंग द्वारा संचालित राजमाता जिजाऊ शक्ती कराटे ग्रुप च्या माध्यमातून हजारो महिला व मुलींना निशुल्क कराटे प्रशिक्षण देण्यात येत आहेत तरी आरमोरी शहरातील विद्यार्थिनींनी या प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व स्वतःला शारीरिक व मानसिक मजबूत बनवावे असे आवाहन केले या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थिनींना महापुरुषांचे जीवनचरित्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले व समोरच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या विजेत्या विद्यार्थिनींनी आपल्या विजयाचे श्रेय  युवारंग चे संस्थापक तथा अध्यक्ष मा. राहुलजी जुआरे ,कराटे प्रशिक्षक राजूजी घाटुरकर , सहप्रशिक्षक राजूजी अतकरे ,रोहित बावनकर, मनोज गेडाम व आपल्या पालकांना दिले  या कार्यक्रमाचे संचालन प्रफुल खापरे तर आभार नेपचंद्र पेलणे यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post