वैरागड ग्राम सभेत तंटामुक्त समिती अध्यक्षाचा राजीनामा आणि दोन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना भारमुक्तचा ठराव.


- तंटामुक्त समिती अध्यक्षाचा खाजगी कामामुळे राजीनामा.
- तंटामुक्त समिती अध्यक्षाचा अवघ्या तीन महिन्याचा कार्यकाळ.
- पुर पिडित सर्वेक्षण कामात दिशाभूल, पाणी पुरवठा आणि संगणक चालक यांना भारमुक्तचा ठराव.



वैरागड : - गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील सर्वात मोठी समजण्यात येणाऱ्या वैरागड ग्रामपंचायत मध्ये दि. ०९ नोव्हें. रोजी घेण्यात आलेल्या सर्वसाधारण ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष हिरामण जैराम मुंगिकोल्हे यांनी लेखी राजीनामा दिला तर ग्रामपंचायतचे पाणी पुरवठा कर्मचारी नारायण वासुदेव धनकर आणि संगणक चालक प्रकाश पूनाजी नागोसे यांना पुर पिडित सर्वेक्षण कामात दिशाभूल केल्या प्रकरणी भारमुक्तचा ठराव घेण्यात आला.

येथील ग्रामपंचायत मध्ये दुपारी घेण्यात आलेली सर्वसाधारण ग्रामसभा आरमोरी पंचायत समिती माजी उपसभापती विनोद दिवाकर बावनकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात करण्यात आली. या सभेत ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेले मेंढेबोडी येथे रहिवासी असलेले महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष हिरामण जैराम मुंगिकोल्हे यांनी स्वतःच्या खाजगी कारणामुळे लेखी स्वरूपात राजीनामा दिला. महत्वाची बाब म्हणजे हिरामण मुंगिकोल्हे ०८ ऑगस्ट २०२२ रोजी तंटामुक्त समिती अध्यक्ष झाले होते. त्यांनी अवघ्या तीन महिन्याचा कार्यकाळ काढला. त्यानंतर सभेत अध्यक्षाच्या परवानगीने विषय घेण्यात आले. या विषयात ग्रामपंचायतचे पाणी पुरवठा कर्मचारी नारायण वासुदेव धनकर आणि संगणक चालक प्रकाश पूनाजी नागोसे यांनी पुर पिडित सर्वेक्षण कामात दिशाभूल केल्या बाबत राजू खोब्रागडे आणि इतर नागरिकांनी विषय सुचविले तर याला संजय वासनिक आणि इतर नागरिकांनी अनुमोदन दिल्याने यावर सविस्तर चर्चा करून दोन्ही कर्मचाऱ्यांना नोकरीवरून 
खाली करा असे सर्वानुमते ठरविण्यात येऊन मंजुरी देण्यात आली.



झालेल्या सर्वसाधारण ग्रामसभेत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त समिती अध्यक्ष, पोलिस पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी आणि गावातील शेकडोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. ग्रामसभेच्या कामकाजाचे वृतातर अहवाल ग्राम विकास अधिकारी बोदेले यांनी पाहिले.

Post a Comment

Previous Post Next Post