जळगाव बनवले सिंगापूर कि नरकपुर?


जळगाव:-   मागील दहा वर्षांपासून जळगाव शहर भकास झाले आहे.याची माहिती आमदार खासदार मंत्रीला होती.म्हणून मंत्री मा.गिरीश महाजन म्हणाले होते कि, जळगाव महापालिका आमच्या ताब्यात द्या.आम्ही एका वर्षात शांघाय,हॉंगकांग, सिंगापूर सारखे बनवू.दिली सत्ता.७५पैकी ५७नगरसेवक भाजप चे निवडून दिले.चार वर्षे झालीत पण सिंगापूर तर सोडा साधी पाचोरा अमळनेर ची बरोबरी करू शकले नाहीत.उलट भकास करून ठेवले.अनेक रहिवासी जळगाव सोडून जात आहेत.तर मग,मागे उरतील कोण?ते ५७नगरसेवक आणि भाजपचे आमदार व मंत्री ?पैकी २७ नगरसेवक तर महाजन यांनाच अंगठा दाखवून शिवसेनेत पळून गेले. ते तितकेच निष्ठावान होते,विष्ठा टाकून पळाले. भाजपची मनपाची सत्ता गेली.तरीही ही मंडळी पळून गेलेल्या नगरसेवकांची पाय धरणी,मन धरणी करीत आहेत.ज्यांना निवडून आणले,सत्तेवर आणले तेच बेईमान झाले तर जळगाव सुधारेल कसे? आम्हाला प्रश्न पडतो,इतक्या बेईमान नगरसेवकांवर आमदार व मंत्रीचे प्रेम का? यातील रहस्य नाही कळले तरी अनुभव मात्र भयंकर आला आहे.
     मनपाची सत्ता होती,ती जरी गेली असली तरी भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनी सुद्धा एकही रस्ता बनवला नाही.उपयोग काय,अशा आमदाराचा? ज्यांच्या मुळे नागरिकांचे कंबरडे मोडले ?दारू पिऊन ही कंबरेचे दुखणे विसर पडत नाही. प्रत्येक नागरिक महाजन आणि मामांना शिव्यांची लाखोली वाहात आहेत.आम्ही तर श्री महाजन यांना समक्ष भेटून सांगितले कि,भोळेंना पुन्हा उमेदवारी दिली तर आख्खे जळगाव विरोधात जाईल.आता मोदींची आणि फडणवीस यांची तितकी क्रेझ राहिली नाही कि कोणीही निष्क्रिय माणूस आमदार निवडून येईल.
    खूप हाल केलेत जळगावच्या नागरिकांचे.आठ वर्षात उखडलेले रस्त्यावर चालून नागरिकांचे आठ वर्षे आयुष्य कमी केले आहे,या आमदारांनी.जर हेच मामा पुन्हा आमदार झाले तर पुढील दहा वर्षांत अर्धे जळगाव आर्थोपिडीक दवाखान्यात दाखल होईल.

*व्हिडियो जरूर बघा*
👇👇👇👇👇👇


    नागरिकांनो, फक्त शिव्या घालून ,बोटे मोडून ,दोष देऊन हे संकट टळणार नाही.आमदार आणि मंत्री हेच संकट बनलेले आहे.आणि यांनी निवडून आणलेले ५७नगरसेवक.कोण भाजपात,कोण शिवसेनेत?हेच कळत नाही.कोण सख्खा आणि कोण सावत्र? कोणीच सांगत नाही. महापौर कोण ? नवरा कि बायको?तेच कळत नाही.

व्हिडियो
👇👇👇👇👇


    जळगाव जिल्हा न्यायमंदिर समोरची ही गटार आमच्या औदासिन्याची साक्ष देत आहे.आमच्या निर्बुद्धपणाची निशाणी आहे.बोगस नगरसेवक आणि बोगस आमदार असल्याचा पुरावा देत आहे.मामा आणि महाजन यांचेशी कितीही वादविवाद केला तरी नागरिकांना न्याय मिळणार नाही.आता आमचे नगरसेवक आणि आमदार दोन्ही बदलणे आवश्यक झाले आहे.मंत्री महाजन यांच्या शब्दावर विश्वास ठेवून ही फसवणूक झालेली आहे.अशी फसवणूक पुन्हा करून घ्यायची का?याचा विचार नागरिकांनी केला पाहिजे.

.... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

Post a Comment

Previous Post Next Post