प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं, असे म्हणत तंटामुक्ती समितीने लावून दिला प्रेमविरांचा विवाह

चिखली  : प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं, एकदा प्रेमात पडल की सर्व काही छानच दिसते, म्हणुनच म्हणतात प्रेम हे आंधळ असते, प्रेमासाठी काहीपण अशीच एक घटना मूल तालुक्यातील चिखली येथे घडली, शेवटी तंटामुक्त समितीच्या पुढाकारातुन प्रेमविरांचा विवाह लावुन देण्यात आला.



मूल तालुक्यातील चिखली येथील शुभम रामु मेश्राम वय 25 वर्षे आणि सिंदेवाही येथील पोर्णिमा मधुकर मेश्राम वय 24 वर्षे हे एकमेंकाना ओळखत होते, ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले, साथ जियेगे साथ मरेंगे म्हणत प्रेमात एकांत बुडाले आणि प्रेमविवाह करण्यासाठी कुटुंबियाचा विरोध असल्याने प्रेमविरांनी चिखली येथील तंटामुक्त समितीकडे प्रेमविवाह करुन देण्याची विनंती केली, तंटामुक्त समितीच्या पुढाकारातून आणि नागरीकांच्या उपस्थितीत चिखली येथील साईबाबा मंदिरामध्ये शुभम मेश्राम आणि पोर्णिमा मेश्राम यांचा विवाह लावुन देण्यात आला.

व्हिडियो
👇👇👇👇👇

व्हिडियो
👇👇👇👇


यावेळी चिखलीचे उपसरपंच दुर्वास कडस्कर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बबन कडस्कर, माजी सरपंच उमाजी दादा मंडलवार, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष डोपाजी पाटील कडस्कर, सामाजिक कार्यकर्ते गिरीधर वाकुडकर, एकनाथ काटवले, रमेश मेश्राम, उमेश पाल, पुरुषोत्तम बोरकुटे व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
व्हिडियो
👇👇👇👇


Post a Comment

Previous Post Next Post