जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा अमिर्झा येथे बालक दिन तसेच बालक पालक मेळावा कार्यक्रम साजरा करण्यात आला

*प्रशांत भैसारे गडचिरोली प्रतिनिधी*


आज दिनांक 14 नोव्हेंबर 2022 जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा अमिर्झा येथे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालक दिन बालक पालक मेळावा , कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीकांत जी काथोटे सदस्य शाळा व्यवस्थापन समिती अमिर्झा कार्यक्रमाचे उद्घाटक संदीप भैसारे उपसरपंच ग्रामपंचायत अमिर्झा कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ग्रामविकास अधिकारी अनिलकुमार खेवले ,तसेच रामभाऊ नन्नावरे, चंद्रहास करंडे, मारोती श्रीरामे, प्रशांतजी धारणे, सुधाकरजी धाकडे, खोब्रागडे मॅडम मुख्याध्यापक, सोनुताई जांभूळकर, भारती डहाके, वैशाली उंदिरवाडे, नरेश समर्थ, मोहन सावसाकडे तसेच गावातील नागरीक उपस्थित होते. बालकदिनाचे औचित्य साधून शाळाकरी मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा घेण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post