पिलापूर येथे कार्तिक पौर्णिमाचा कार्यक्रम जल्लोषात साजरा ::-



राजेंद्र बागडे.
नागपूर जिल्हा विभागीय प्रतिनिधी ता.8

        कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने नरखेड तालुक्यातील पिलापूर या गावात दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा दिनांक 6 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर रोजी या दोन दिवसीय भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमा मध्ये गावात भजन दिंडी, रामायण कथन, आणि गावात रॅली काढून नागरिकांनी व महिलानी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. तसेच रात्रीला टिपूर जाळण्यात आले यावेळी या कार्यक्रमाला माजी सभापती स्वप्नील नागपूरे, विक्की राठोड, सुभाष घरकोंडले,अमित राठोड, प्रभू नारनवरे, हरबनसिंग राठोड, बबनसिग राठोड, हिवराज बोरीवर, भरतसिंग राठोड, आदी समस्त गावकरी नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post