दारुचे पैसे देण्याच्या वादावरून माजी शिक्षकास कमरपट्ट्याने झोडपले...



देसाईगंज:- फुकटची दारू पिऊन पैसे देण्याच्या वादावरून झालेल्या बाचाबाचीचा वाद असह्य झाल्यामुळे संतापलेल्या एका युवकाने माजी शिक्षकाला कमरपट्ट्याने चांगलेच बदडून मोटारसायकलची देखील तोडफोड केली असल्याची घटना देसाईगंज- लाखांदुर मार्गावरील को ऑपरेटिव्ह बँकेसमोर नुकतीच रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास घडली.

व्हिडियो बघून सबस्क्राईब जरुर करा 
👇👇👇👇👇👇👇👇






दरम्यान आक्रमक झालेल्या युवकाची पिटाई पाहुन बँकेच्या मागच्या बाजूला असलेल्या अंधाराचा फायदा घेत माजी शिक्षक बसल्याने थोडक्यात बचावला असल्याचे सांगण्यात येत आहे. दारू पिऊन झाल्यानंतर दारू विक्रेत्याने पैशाची मागणी केली असता दोघांत शाब्दिक बाचाबाची झाली. यामुळे राग अनावर झालेल्या युवकाने कमरपट्ट्याने त्याला चांगलेच बदडल्याचे सांगण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post