जंगलातील रस्त्यावर कारमधून खाली उतरणं पडलं महागात; वाघाने हल्ला करून महिलेला नेलं ओढून

नवी दिल्ली, : सध्या सुट्यांचा काळ सुरू आहे. अशावेळी अनेक कुटुंब पर्यटनाचा प्लॅन आखतात. कार किंवा खासगी वाहनाने दूरवरचा प्रवास करण्याला प्राधान्य दिलं जातं. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी अनेकदा जंगलातून जाणाऱ्या रस्त्यावर वाहन थांबवले जाते; पण असं करताना योग्य ती काळजी घ्यावी लागते, अन्यथा वन्य प्राण्यांचा हल्ला होऊन जीव गमावण्याचा धोका अधिक असतो. असाच एक अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात कारजवळ थांबलेल्या एका महिलेवर वाघाने हल्ला करून तिला जंगलात ओढून नेल्याचं स्पष्ट दिसत आहे.

व्हिडियो जरूर बघा
👇👇👇👇👇



लांब पल्ल्याचा प्रवास करताना अनेकदा घनदाट जंगलाच्या रस्त्याने जावं लागतं. अशा ठिकाणाहून जाताना बऱ्याचवेळा माकडं, साप, हरिण असे वन्यप्राणी दिसत असतात. त्यांना पाहण्याचा मोह आवरत नाही म्हणून आपण वाहनाच्या खाली उतरतो. पण हिंस्र प्राण्यांचा हल्ला होण्याची शक्यताही नाकारता येत नसते. व्हायरल झालेल्या व्हिडिओतही बेसावध असलेल्या महिलेला वाघाने क्षणाधार्थ ओढून नेल्याचं दिसतं आहे. हा व्हिडिओ बराच जुना असला तरी सध्या तो प्रचंड व्हायरल होत आहे. हल्ल्याचा हा व्हिडिओ पाहून नेटिझन्स हळहळ व्यक्त करत आहेत. व्हायरल व्हिडिओत दिसतं त्याप्रमाणे, जंगलातून जाणाऱ्या रस्त्यावर दोन-तीन कार उभ्या आहेत. सर्वांत पुढे असणाऱ्या कारमधून एक महिला खाली उतरते आणि त्याचवेळी एक वाघ जंगलातून बाहेर पडतो आणि महिलेवर हल्ला करतो व महिलेला जंगलात ओढून नेतो. ही घटना घडत असताना कारमधील महिलेचे नातेवाईक तिला वाघाच्या तावडीतून सोडवण्यासाठी प्रयत्न करतात. पण यात ते अयशस्वी ठरतात असं व्हिडिओत दिसत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post