बापरे बाप...महिलेवर दोन वाघाचा हल्ला... हल्ल्यात महीला ठार


चंद्रपूर : नेहमी प्रमाणे शेतावर गवत घेण्यासाठी गेलेल्या एका 57 वर्षीय महिलेवर दोन वाघांनी हल्ला करून ठार केल्याची घटना काल शनिवारी सायंकाळी तीन वाजताच्या सुमारास नागभीड तालुक्यातील पाहार्णी शेतशिवारात घडली. वनिता वासुदेव कुंभरे (वय 57 ) असे मृतक महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे पहाण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शेतक-यांचे शेतावर जाणे बंद झाले आहे. वनविभागाने वाघांच्या बंदोबस्तासाठी तातडीने या ठिकाणी पिंजरा लावला असून त्यामध्ये रेडा बांधण्यात आला आहे.

व्हिडियो 
👇👇👇👇


प्राप्त माहिती नुसार, काल शनिवारी नेहमी प्रमाणे गवत घेण्यासाठी एक किमी अंतरावरील पहार्णी शेतशिवारात वनिता कुंभरे ही महिला गवत घेण्याकरीता तर घरचे कुटूंबीय अन्य कामाकरीता गेले होते. घरच्या कुटूंबीयांनी सायंकाळी तीन वाजेपर्यंत शेतात पाणी देण्याचे काम केल्यांनतर ते घरी परत आले तर महिला शेतावरच गवत घेत होती. मात्र सायंकाळ होवूनही ती घरी परत आली नाही. त्यामुळे तिचा शोध घेण्याकरीता कुटुंबीय गेले असता शेतात गवत आणि गवत घेण्याकरीता वापरण्यात आलेली विरुली पडून असल्याचे मृतदेह आढळून आला. लगेच गावात घटनेची माहिती होताच घटनास्थळाकडे नागरिकांनी धाव घेतली. यावेळी घटनास्थळार दोन वाघ आढळून आलेत. नागरिकांच्या गर्दीतही वाघ इतरत्र पळून जाण्यास धजावत नव्हते. बराचवेळ वाघांनी एकाच ठिकाणी बसस्थान मांडले होते. नागरिकांवरही वाघ गुरगुरत होते. त्यामुळे मृतदेह ताब्यात घेण्यास अडचण आली. त्यानंतरवनविभागाला माहिती देण्यात आली. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वाघांनी घटनास्थळावरुन पळ काढल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला परंतु धड व मुंडके वेगवेगळे झाले होते. काल रात्री धड मिळाल्यानंतर मुंडके मात्र आढळून आले नाहीत. आज सकाळी पुन्हा शोधाशोध केली असता काही अंतरावर मुंडके आढळून आले. सदर महिलेचा मृत्यू दोन वाघांच्या हल्यात झाल्याचे दोन्ही वाघांच्या ओढताणी मध्ये मुंडके व धड वेगळे झाले. मृतक महिलेला पती, दोन मुले व एक मुलगी आहे.

वाघाच्या बंदोबस्तासाठी पिज-यात ररेडा बांधला

पहार्णी परिसरात काही दिवसांपासून दोन वाघांचे दर्शन होत आहेत. काल शनिवारी दोन वाघांनी एका महिलेचा बळी घेतल्यानंतर प्रचंड दहशत पसरली आहेशेतक-यांनी शेतावर जाणे बंद केले आहे. या घटनेची दहशत लक्षात घेता वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावून वाघाला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. पिंज-यात रेडा बांधण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post