लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईचे अध्यक्ष विरेंद्र म्हात्रे यांना छत्रपती शाहू महाराज समाज भुषण पुरस्कार २०२२ जाहीर..



नवी मुंबई : दैनिक झुजार केसरी च्या माध्यमातुन राजकिय, सामाजिक, सहकार, सांस्कृतिक,कला-क्रिडा,उद्योग,शिक्षण या विविध.क्षेत्रामध्ये काम करणार्या मान्यवरांना पुरस्कार देण्याचे काम हि संस्था करत आहे. व्यक्ति आणी संस्था यांच्या कार्याचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देवुन त्यांच्या कार्याला बळ देण्याचे काम हि संस्था करत आहे.दैनिक झुजार केसरी चे पुरस्कार देण्याचे हे पहिले वर्ष आहे.महाराष्ट्रातील विविध भागातुन पुरस्करासाठी अर्ज मागविण्यात आले होते.

यामध्ये नेरूळ मधील लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे यांचे कार्य प्रभावीपणे संस्थेच्या निदर्शनास आले म्हणुन त्यांना छत्रपती शाहू महाराज समाज भुषण पुरस्कार 2022 ने सन्मानित करण्यात येत आहे अशी माहीती दै. झुंजार केसरी चे मुख्य संपादक मा.श्री मुनीर व. खान

लवकरच हा सोहळा रविवार दिनांक 13 नोव्हेंबर 2022 रोजी जय भगवान हॉल हरि निवास सर्कल नौपाडा ठाणे (प) या ठिकाणी आयोजित करून सर्व पुरस्कार प्रदान केले जाणार आहे अशीही माहीती त्यांनी दिली.



लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना छत्रपती शाहू महाराज समाज भुषण पुरस्कार २०२२ जाहीर झाल्यामुळे सर्वच स्थरातुन त्यांचे कौतुक होत आहे.नेरुळ गांवातील नागरीकांनी देखील त्यांचे अभिनंदन केले आहे.


पुरस्कार मिळाल्याबद्दल लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे बोलताना सांगितले कि जिवन जगत असताना आपण या समाजाला काही तरी देणं लागत. आणी हिच भावना मना मध्ये ठेवुन मी गेली अनेक वर्ष नेरूळ मध्ये काम करत आहे.तसे पाहीले तर कोणतही राजकिय पाठबळ नसताना समाजाची सेवा करण खुप अवघड असत.परंतु यातुनही आम्ही मार्ग काढला.आणी जे काही या समाजात वंचित घटक आहे. त्यांना मदत करत गेलो.यात  मला सर्वांची मदत झाली. आणि सर्वांच्या सहकार्याने हे काम शक्य झालं.आज जो मला  छत्रपती शाहू महाराज समाज भुषण पुरस्कार २०२२ मिळणार आहे. त्या पुरस्काराचे खरे मानकरी माझ्या बरोबर काम करणारे माझे सर्व सहकारी या आहेत.या कोरोना महामाराच्या काळामध्ये आम्ही लोकांना मोफत मास्क पुरवले, सॅनिटायझर पुरवले,तसेच अनेक ठिकाणी रोशन देखील पुरविले आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिर, ५०℅ सवलत चे हेल्थ कार्ड वाटप , अल्बम३०गोल्याचे  वाटप, पुरग्रर्ताना मदत करणे .या कामी लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईच्या सदस्य चे खुप असे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.हा पुरस्कार मला देवुन माझ्या संस्थेचा व माझ्या कार्याचा गौरव केल्याबद्दल मी दै. झुंजार केसरी चे मुख्य संपादक मा.श्री मुनीर व. खान यांचे मी आभारही मानतो. सहकार्य लाभले.हा पुरस्कार मला देवुन माझ्या संस्थेचा व माझ्या कार्याचा गौरव केल्याबद्दल मी दै. झुंजार केसरी चे मुख्य संपादक मा.श्री मुनीर व. खान याचे मी आभार ही मानतो.

याशिवाय विरेंद्र म्हात्रे यांनी लॉकडाऊन काळात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल यशवंतराव चव्हाण फाउंडेशन मुंबई यांच्या कडुन यशवंतराव चव्हाण पुरस्कार - 2020,युथ फोरम सोशियल असोसिएशन यांच्या कडुन छत्रपतीं शिवजी महाराजांचे मावळे पुरस्कार -2021, जनाई- मुक्ताई समाज भूषन पुरस्कार -2021, अखिल भारतीय मानव विकास परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नवी मुंबई भूषण पुरस्कार 2022, आदर्श मुंबई प्रेसच्या वतीने प्राईड ऑफ इंडिया पुरस्कार2022 स्वतंत्र पत्रकार संघ यांच्या कडून राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार2022 शिव ग्रुप, महाराष्ट्र रोशनी न्यूज, लायंस ग्रुप महाराष्ट्र राज्य, भुमिपुत्र फाउंडेशन, दिव्या  सृष्टी धारा फाउंडेशन महाराष्ट्र, नवयुग उत्सव मित्र मंडळ नेरुळ, शिवसाई मित्र मंडळ मुंबई, पुणे प्रवाह कोविड १९ चा माहायोध्दा पुरस्कार -२०२०, साक्षि शैक्षणीक व सामाजिक संस्था नेरुळ,  पोलिस सेवा संघ महाराष्ट्र राज्य,शिव आदर्श लोकसेवा संस्था नवी मुंबई,राईज इंडीया फाउंडेशन,  संतोष फाउंडेशन मुंबई,दैनिक मुंबई मित्र, पत्रकार उत्कर्ष समिति महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र यशवंत सेना, दैनिक ठाणे कट्टा , आपना फाउंडेशन, संकल्प युवा फाउंडेशन (पुणे), संकल्प युथ फाउंडेशन(कोल्हापूर),चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या वतीने covid-19, चर्मकारविकास संघ (सोलापूर), दैनिक महाराष्ट्र सम्राट , दैनंदिन शहरनामा, जनकल्याण सेवा फाउंडेशन, निहित सोशल फाउंडेशन(पुणे), एकता फाउंडेशन (पुणे), दैनंदिन वार्ताहर, मानवता हिताय सोशल फाउंडेशन प(पुणे), श्री गुरुकुपा सेवाभावी बहुद् देय सेवाभावी संस्था,आगरी कोळी समाज चाँरिटेबल ट्रस्ट , श्री राम सोसायटी(मुंबई), इकतारा फाउंडेशन, भारतीय महा क्रती सेना महाराष्ट्र राज्य, हिंदुस्थान २४तास , सत्यमेव जयते ट्रस्ट ( इंडीया) , श्री. गणेश वैष्णवी सेवभावी संस्था, राष्ट्रवादी कामगार सेना,राष्ट्रवादी अल्पसंख्यक विभाग नवी मुंबई, , सोन्याची माणसं प्रतिष्ठान,गुन्हे पोलिस टाईम्स, प्रहार जनशक्ती पक्ष ,  कामगार सेना ,डि.एस.आर.आर. नुज,शिवराज्य मुस्लिम फ्रट, राष्ट्रीय जन उधोग व्यापारी संगठना (दिल्ली) , मराठी साप्ताहिक आपला समाज मार्गदर्शक, डिजिटल महाराष्ट्र नुज चायनल आणि दैनिक ठाणे कट्टा या संस्थेच्या वतीने करोना योद्धा सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलेले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post