पोलीस मदत केंद्र मालेवाडा येथे भव्य जनजागरण मेळावा, विविध स्पर्धेचे आयोजन

मालेवाडा वार्ताहर (एजाज पठाण )....

माननीय पोलीस अधीक्षक श्री. निलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अनुज तारे सा. मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. चिंता सा. यांचे संकल्पनेतून व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मदत केंद्र मालेवाडा येथे आज दिनांक 18/11/2022 रोज शुक्रवारला भव्य जनजागरण मेळावा, भगवान बिरसा मुंडा व्हॉलिबॉल स्पर्धा, राणी दुर्गावती हस्तकला स्पर्धेचे आयोजन करण्यात होते.

व्हिडियो जरूर बघा 
👇👇👇👇👇👇


सदर कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमती गीता ताई कुमरे (जि. प. सदस्य गडचिरोली ) यांनी भगवान बिरसा मुंडा व वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व प्रज्वलीत करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.


सदर कार्यक्रमाला सौ. अनुसया पेंदाम सरपंच ग्रामपंचायत मालेवाडा, श्रीमती निर्मला मुळकाम ग्रामपंचायत सदस्य मालेवाडा, श्री आनंदराव भोगा ग्रामपंचायत सदस्य मालेवाडा, श्री. डॉ.प्रमोद उंदीरवाडे प्राथमिक आरोग्य केंद्र मालेवाडा, प्राचार्य श्री विनोद कुमार जीप काटे सर साईनाथ विद्यालय मालेवाडा, बाळकृष्ण शेडमाके, श्री लंकेश वडे तलाठी मालेवाडा, तसेच पोलीस मदत केंद्र मालेवाडा हद्दीतील सर्व पोलीस पाटील व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सदर जनजागरा मेळाव्याचे औचित्य साधून उपस्थित मान्यवरांनी आरोग्य ग्रामपंचायत योजना शिक्षण इत्यादी विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच पोलीस मदत केंद्र मालेवाडा येथील प्रभारी अधिकारी श्री नारायण राठोड यांनी गडचिरोली पोलीस प्रशासना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पोलीस दादाला खिडकीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध योजना बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

सदर मेळाव्यात भगवान बिरसा मुंडा वॉलीबॉल स्पर्धा घेण्यात आले. सदर वाली बॉल स्पर्धेत पोलीस मदत केंद्र मालेवाडा हद्दीतील 20 संघाने सहभाग घेतला. आज दिनांक18/11/2022 रोजी सर्व संघांचे साखळी सामने घेण्यात आले. दिनांक 19/11/2022 रोजी बाद सामने घेण्यात आले.व आज दिनांक 20/11/2022 रोजी अंतिम सामने, राणी दुर्गावती हस्तकला स्पर्धा, आदिवासी रेला नृत्य स्पर्धा घेण्यात आले.




Post a Comment

Previous Post Next Post