कानुन के हाथ बडे लंबे होते है.... म्हणत छातीपासून मुंडके वेगळे करणाऱ्या आठ आरोपींना अखेर अटक

चंद्रपुर :- दुर्गापूर निर्घुण हत्याकांडातील 8 संशयीत आरोपीतांना वर्धा कडे स्कॉर्पीओ वाहनाने पळुन जात असतांना पाठलाग करून आरंभा टोल नाका, जिल्हा वर्धा येथून काही तासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फिल्मी स्टाईल ने पाठलाग करत आरोपींना ताब्यात घेतले.

दिनांक 07/11/2022 रोजी 10 -30 वा. ते 11 वाजता चे सुमारास पो.स्टे. दुर्गापूर हद्दीत ईमली बार व नायरा पेट्रोलपंप समोर दुर्गापूर रोडवर पुर्व वैमन्यस्यातून 7 ते 8 इसमांनी मृतक नामे महेश मेश्राम रा. दुर्गापूर हा ईमली बार येथे मित्रा सोबत गेला असताना नमुद आरोपीतांनी त्यांचेवर पाळत ठेवून घेराव घालून धारदार चातक शस्त्रांनी वार करून जिवानीशी ठार केले व त्याचे शिर निर्दयपणे धडावेगळे करून घटनास्थळापासून अंदाजे 50 मिटर दूर फेकून पळून गेले. अशा रिपोर्ट दुर्गापूर पोलीस स्टेशनला अप क 89 / 2022 कलम 302, 143, 147, 149, 427 भा. द. वी. सह कलम 4. 25 भारतिय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.



सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर सदर गुन्हयातील आरोपीतांचा तात्काळ शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दिले. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप कापडे, सहायक पोलीस निरीक्षक नंगेश भोयर, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पोउपनि अतुल कावळे यांचेसह अंमलदारांची चार विशेष शोध पथके गठीत करण्यात आली.


सदर पथकांनी अज्ञात आरोपीताचे नांव व त्यांचे ठावठिकाणा बाबत गोपनिय माहिती प्राप्त करून तांत्रीक तपास केला असता यातील संशयीत आरोपीत इसम हे वर्धा जिल्हयात स्कॉर्पीओ गाडीने पळुन जात असल्याची गोपनिय माहिती प्राप्त झाली. त्यावरून लागलीच सदर वाहनाचा माग काढून स्था.गु.शा. चे सपोनि कापडे व सपोनि भोयर यांचे पथकानी पाठलाग करून सदर स्कॉर्पीओला आरंभा टोल नाका, जिल्हा वर्धा येथे दोन वाहने आडवे लावून अडविले व योग्यती काळजी घेवून शिताफीने वाहनामधील संशयीत नामे 1) अतुल मालाजी अलीवार, वय 22 वर्ष रा. समता नगर वार्ड क 6 दुर्गापुर, 2) दिपक नरेद्रं खोब्रागडे, वय 18 वर्ष रा समता नगर वाड क 6 दुर्गापुर, 3) सिध्दाथ आदेश बन्सोड, वय 21 वर्ष रा नेरी दुर्गापुर, 4] संदेश सुरेश चोखान्द्रे, वय 19 वर्ष रा सम्राट अशोक वार्ड क 2 दुर्गापुर चंद्रपुर, 5) सुरज दिलीप शहारे वय 19 वर्ष रा समता नगर वार्ड के 6 दुर्गापुर, 6) साहेबराव उत्तम मलिये वय 45 वर्ष रा नेरी समतानगर वाड क 6 दुर्गापुर, 7) अजय नानाजी दुपारे वय 24 वर्ष रा उर्जानगर कोंडी दूर्गापुर व 8) प्रमोद रामलाल सूर्यवंशी, वय 42 वर्ष रा उर्जानगर दुर्गापुर अशा एकूण 8 संशयीत आरोपीत इसमांना स्कॉर्पोओ वाहनासह गुन्हा घडल्याणसुन अवघ्या काही तासात ताब्यात घेतले.


सदर संशयीत आरोपीतांना स्थानिक गुन्हे शाखेत आणुन त्यांचेकडे गुन्हयासबधाने विचारपुस केली असता सदर गुन्हयाबाबत चौकशी केली असता यातील स्शईत आरोपी क्र. 1 ते 6 यांचा सदर गुन्हयात प्रत्यक्ष सहभागी असून यातील आरोपी क्र. 7 व 8 यांनी आपले चाव्यातील चारचाकी स्कॉर्पीओ वाहन क्र. एम.एच. 04 जिझेड 9091 नी वरिल नमुद अरोपीतास पळुन जाण्यास मदत केली असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न होत असल्याने नमुद आरोपीतांना पुढील तपासकामी पोलीस स्टेशन दुर्गापूर यांचे ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास दुर्गापूर पोलीस करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी सतोषसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रीना जनबंधू यांचे मार्गदर्शनाखाली बाळासाहेब खाडे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांचे नेतृत्वात स्था. गुशा. चे स.पो.नि. जितेंद्र बोबडे, स.पो.नि. सदीप कापडे, स.पो.नि. मंगेश भोयर, पोउपनि कावळे, पो. हवा. संजय आतकुलवार, धनराज करकाडे, सुरेद्र महतो, नितीन साळवे, ना. पो. कॉ. सुभाष गोहोकार, संतोष येलपुलवार, जमीर पठाण, मलिंद चव्हाण, गजानन नागरे, अजय बागेसर पो कॉ गोपाल आतकूलवार, नितीन रायपुरे, रविंद्र पंधरे, गणेश भोयर, गणेश मोहुर्ले, मिलींद जाभुळे, प्रशांत नागोसे, गोपीनाथ नरोटे, महीला अंगलदार अपना गानकर तरोच सायवर पोरटे येथील पोहवा मुजावर अली यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post