उराडी येथील युवारंग च्या निःशुल्क ट्युशन क्लासेसच्या द्वितीय सत्राला सुरुवात.*

*उराडी येथील युवारंग च्या निःशुल्क ट्युशन क्लासेसच्या द्वितीय सत्राला सुरुवात.*


कुरखेडा :- कुरखेडा तालुक्यातील उराडी येथे युवारंग तर्फे गरजू विद्यार्थ्यांच्या मानसिक व शारीरिक विकासासाठी मागील दोन वर्षापासून निशुल्क शिकवणी ( ट्युशन ) वर्गाचे आयोजन करण्यात येत आहे जगद्गुरु तुकाराम महाराज ,राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती संभाजी महाराज , राजश्री छत्रपती शाहू महाराज ,क्रांतिकारी बिरसा मुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर , क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, तुकडोजी महाराज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शहिद ए आझम भगतसिंग , सर्व संत व महापुरुषांच्या इतिहासातून प्रेरणा घेत व महापुरुषांचे विचार शिकवणी वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये रुजवून आपल्या गावातील विद्यार्थ्यांचा मानसिक व शारीरिक विकास करून देशाचे सक्षम नागरिक करण्याच्या उद्देशाने
युवारंग तर्फे निशुल्क शिकवणी वर्गाच्या दृतीय सत्राला. आज दिनांक ०२ नोव्हेंबर २०२२ बुधवार ला
सुरुवात करण्यात आली. तरी या कार्यक्रम प्रमुख मार्गदर्शक म्हणून. युवारंग क्लब शाखा उराडी चे अध्यक्ष. साहिल भाऊ वैरागडे, सामाजिक कार्यकर्ते राधेश्याम भाऊ दडमल, युवारंग निशुल्क शिकवणी वर्गाचे शिक्षक अंकित मोहुर्ले, अभिजित भाऊ रंधये, शरद भाऊ चौधरी, विकास भाऊ चौधरी, व युवारंग क्लब चे सदस्य व तसेच शिकवणी वर्गाचे विध्यार्थी व विध्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते .

Post a Comment

Previous Post Next Post