धान बोनसच्या मागणीसाठी रस्त्यावर 'आक्रोश' करणारेच आता सत्तेत असताना तोंड बंद करून बसले आहेत - शेतकऱ्यांचा आरोप

धानाला यावर्षी तरी बोनस मिळणार का?


हिवाळी अधिवेशनाकडे राज्य शेतकऱ्यांचे लक्ष

गडचिरोली : धानाची शेती कसताना लागवड खर्च भरून निघत नाही. शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळत नसल्याने शासनाकडून प्रतिक्विंटल बोनस दिला होता; परंतु २०२१- २२ या हंगामातील बोनस शेतकऱ्यांना मिळाला नाही, तसेच २०२२-२३ या वर्षांतही बोनस मिळण्याची अनिश्चितता कायम आहे. विशेष म्हणजे, मार्च २०२२ मध्ये धान बोनसच्या मागणीसाठी रस्त्यावर 'आक्रोश' करणारेच आता सत्तेत असताना मूग गिळून बसले आहेत काय ? असा प्रश्न शेतकरी करत आहेत. धानाची शेती तोट्यात जात असताना शेतकऱ्यांकडून योग्य हमीभाव देण्याची मागणी सातत्याने केली जात होती.

मागे ठाकरे सरकार कोसळल्या नंतर आता हल्ली असलेल्या सरकारने धनाचा बोनस देण्याचा अजूनही निर्णय घेतला नाही. आणि हेच नेते मागील ठाकरे सरकार च्या वेळेस धानला बोनस मिळाला पहिजे म्हणून ठिकठिकाणी मोर्चे काढले होते पण आता या सत्ताधारी पक्षाचे विदर्भातील आमदार, खासदार 'तेरी भी चूप मेरी भी चूप' या विचारात चूपचाप बसुन आहेत. अश्या नेत्यांना भविष्यात धानाचा बोनसचा जाब विचारून धडा शिकवला जाईल असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. म्हणून जाती धर्माच्या पलीकडे जाऊन जो आपला आर्थिक विकास करुण देणार अश्या नेत्यांना निवडून द्यावे अन्यथा शेतकऱ्याच्या बट्याबोळ राहणार नाही. म्हनून शेतकऱ्याने विचार करणे आवश्यक आहे.

Post a Comment

Previous Post Next Post