वडीलाने आपल्या मुलीच्या मदतीने शिक्षिकेला पाठविला चक्क 'लव्ह लेटर' !


उत्तर प्रदेश:- बांदा जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत शिकणाऱ्याचा मुलीच्या वडिलांनी शिक्षिकेला प्रेमपत्र पाठवल्याचे प्रकरण समोर आले असून, शिक्षिकेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. माहितीनुसार, आरोपीने आपल्या मुलीच्या मदतीनेच शिक्षिकेला प्रेमपत्र पाठवले होते.


शाळेत शिकणाऱ्या एका मुलीचा पिता त्रास देतो. शाळेत येता-जाताना रस्त्यात अडवून छेड काढतो. विरोध केल्यास विनाकारण पैशांची मागणी करतो. शाळेत बोलावून त्याची अनेकदा समजूत काढण्यात आली; पण काही उपयोग झाला नाही. आता त्याने मुलीच्या मदतीने लव्ह लेटर पाठवले. बुधवारी आरोपी शाळेच्या परिसरात धारदार शस्त्र घेऊन फिरत होता, त्यानंतर तत्काळ पोलिसांना माहिती दिली असे शिक्षिकेने तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, गिरवा पोलीस ठाण्याच्या परिसरात एका शिक्षिकेने गावातील एका व्यक्तीची तक्रार केली आहे. प्रेमपत्र लिहिल्याची बाबही समोर आली आहे. तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवून पुढील तपास व कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे,' अशी माहिती पोलीस अधीक्षक अभिनंदन यांनी दिली. ही बातमी सोशल मीडियातही व्हायरल झाली आहे

Post a Comment

Previous Post Next Post