स्वच्छतेसाठी रविवारी नवी मुंबईत स्वच्छ सर्वेक्षण 2023 हाफ मॅरेथॉन

स्वच्छतेसाठी रविवारी नवी मुंबईत स्वच्छ सर्वेक्षण 2023 हाफ मॅरेथॉन


विरेंद्र म्हात्रे उपसंपादक नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका व लेट सेलिब्रेट फिटनेसच्या वतीने आयोजित या वर्षीची स्वच्छ सर्वेक्षण 2023 हाफ मॅरेथॉन काही खास असणार आहे. विशेष म्हणजे या वर्षी स्वच्छता या बाबतची जनजागृती या मॅरेथॉनच्या माध्यमातून आयोजक करीत आहेत. हे या स्वच्छ सर्वेक्षण 2023 हाफ मॅरेथॉनचे दुसरे पर्व असून या स्पर्धेत भाग घेण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवित आहेत.


आपल्या समाजात व त्याबाबतची स्वच्छता यावर बोलण्यास कोणीही जास्त पुढे येत •नाही. हीच गोष्ट लक्षात घेऊन दरम्यानची स्वच्छता यावर जनजागृती करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आरोग्य व फिटनेस यावर लक्ष केंद्रित करून समाजातील मुल्य जपण्याचा प्रयत्न केला जातो. ऋचा समीत मॅम संस्थापक लेट सेलिब्रेट फिटनेस च्या यानी स्थापित केलेल्या लेट सेलिब्रेट फिटनेस व नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण 2023 हाफ मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. मागील वर्षी या स्पर्धेला महिलांचा खुप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. असा प्रतिसाद महाराष्ट्रात पहिल्यांदा व देशात दुसऱ्या क्रमांकाचा अशा प्रकारच्या मॅरेथॉनला मिळाला असेल तर ती ही स्पर्धा आहे.

नवी मुंबई शहराची ओळख बनलेल्या या स्पर्धेधी सर्वच स्पर्धक वाट बघतात. या वर्षी रविवारी (दि. 18 डिसेंबर) संपन्न होणान्या या स्पर्धेत 21 किलोमीटर, 10 किलोमीटर तसेच 5 किलोमीटरची फन व फॅमिली पन होईल. स्पर्धेत भाग घेणाऱ्याना टी-शर्ट, मॅडल, पाण्याची बाटली, ज्युस, नाश्ता देण्यात येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post