माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते विकास कामांचे भूमिपूजन*



आ.धर्मराव बाबा आत्राम यांची उपस्थिती

गडचिरोली :- अहेरी तालुक्यातील उमानूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते लाखो रुपयांच्या निधीतून विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

उमानूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या विविध प्रभागात मागील काही दिवसात विविध विकास कामे करण्यात आले.प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिकांनी पावसाळ्यात या परिसरात चिखलाचे साम्राज्य निर्माण होत असून ये-जा करण्यासाठी अडचण होत असून आमच्याही प्रभागात सिमेंट रस्त्याचे बांधकाम करा,अशी मागणी भाग्यश्री ताई आत्राम यांच्याकडे मागणी केली.ताईंनी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे हा विषय मांडून त्वरित निधी उपलब्ध करून दिल्याने आता प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिकांची रस्त्याची समस्या दूर झाली आहे.



उदघाटन प्रसंगी येथील सरपंच श्रीनिवास गावडे,उपसरपंच रवींद्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुकाध्यक्ष श्रीनिवास वीरगोनवार,माजी सरपंच बालाजी गावडे,कैलास कोरेत, सदस्य शांता सडमेक,मोंडी पानेम,आनंदराव तलांडे,आनंदराव गावडे,बापू तोडसाम,रवी गावडे,रंजित सिडाम,नारायण गावडे,मुश्ताक शेख,लक्ष्मी येदासुला, लक्ष्मी सिडाम, गणपत कोडापे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post