ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल माजी आमदार हरीराम वरखडे याचे प्रतिपादन

ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल
माजी आमदार हरीराम वरखडे याचे प्रतिपादन


जोगीसाखरा येथे श्री गुरुदेव सेवा मंडळ व श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 54 पुण्यतिथी साजरी.

जोगीसाखरा - भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या. हे आज तीव्रतेने जाणवते असे प्रतिपादन माजी आमदार हरीराम वरखडे यांनी केले.


आरमोरी तालुक्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पावन पार्श्वभूमी जोगीसाखरा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५४ व्या पुण्यतिथी साजरी करण्यात आली त्या वेळी माजी आमदार हरीराम वरखडे अध्यक्षिय स्थानावरुण बोलतं होते. 

यावेळी किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे. तहसीलदार कल्याण कुमार दहाट पोलिस निरीक्षक मनोज काळबाधे गट शिक्षण अधिकारी कुकुडे सरपंच सदिप ठाकुर श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम हभप सुधाकर भोयर महाराज हभप प्रेमदास वनस्कर अशोकजी सोरते गुरुजी मेनेजर अरुण पत्रे महाराज गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष बाळुजी मानकर. माजी पंचायत समिती सदस्य वृंदाताई गजभिये ग्रा.प.सदस्य अश्विनी घोडाम ग्रा.प.सदस्य प्रतिभा मोहुले ग्रा.प.सदस्य करीष्मा मानकर.ग्रा.प.सदस्य ज्योती घुटके रविशंकर ढोरे युवराज सपाटे यादोराव कहालकर दिलीप रामटेके राजु मेश्राम निलकंठ सेलोकर गुरुजी भिमराव मेत्राम प्रविण राहाटे यशवंत मानकर शरद मडावी दामोदर मानकर पुषोतम ढोरे निलकंठ मैद फाल्गुन मानकर उपस्थित होते.
पुढे माजी आमदार हरीराम वरखडे यांनी ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळा्वे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्‍न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, याविषयी त्यांनी अविरत प्रयत्‍न केले. असेही बोलले 
याप्रसंगी तहशिलदार कल्याणकुमार दहाट यांनी तुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत असत. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला होता. आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना कारावासही भोगावा लागला. अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधुसंघटनेची स्थापना केली. गुरुकुंज आश्रमाच्या शाखोपशाखा स्थापन करून त्यांनी शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळीच निर्माण केली. असे महापुरुषांच्या पुण्यथितीला येण्याचे मला भाग्यलाभल मि नशिबवान समजतो असे बोलले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सचिव नरेंद्र फुलबाधे यांनी केले तर संचालक गणेश शेन्डे यांनी केले आभार प्रदर्शन सतिबावने गुरुजी यांनी केले 
यात गावातुन भव्यदिव्य तुकडोजी महाराज यांची पालखी गाजत वाजत काढण्यात आली 
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री गुरुदेव सेवा मंडळ.व श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेच्या पदाधिकारी कर्मचारी सहकार्य लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post