बसच्या प्रतीक्षेत ताटकळणाऱ्या विद्यार्थ्यांना केले पाण्याच्या बाटल्याचे वाटप



आरमोरी.... ग्रामीण भागातून आरमोरी येथे तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना सकाळी शाळेच्या वेळात व सुट्टी झाल्यावर सायंकाळी सुद्धा वेळेवर बस येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी कुचम्बना होते. सकाळी शाळेत जायच्या वेळेत बस वेळेवर येत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत उशिरा पोहचावे लागत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सायंकाळी सुद्धा शाळेची सुट्टी झाल्यावर बस येत नसल्याने विद्यार्थ्यांना कित्येक वेळा ताटकळत उभे राहावे लागतेआहे.सोमवारी सुद्धा सायंकाळी अंधार पडूनही एस. टी बस न आल्याने ताटकळत व बसच्या प्रतीक्षेत असलेल्या तहानलेल्या विद्यार्थ्यांना समता युवा सामाजिक संघटनेच्या वतीने अध्यक्ष निलेश अंबादे व गोलू वाघरे यांनी पाण्याच्या बाटल्या वाटप केल्या.

तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी आरमोरी येथील शाळा महाविद्यालयात एस. टी. बसने ये जा करीत असतात मात्र सकाळी शाळेच्या वेळेत व सायंकाळी शाळेची सुट्टी झाल्यावर एस. टी. बसेस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असतो.सकाळी शाळेत जाताना बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तर सायंकाळी सुद्धा शाळेची सुट्टी झाल्यावर बस उशिरा येत असल्याने विद्यार्थ्यांना घरी उशिरा पोहचावे लागत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा चिंतेत आहेत सोमवारी सायंकाळी शाळेची सुट्टी झाल्यावर अंधार पडूनही बस उपलब्ध न झाल्याने ६० ते ७० विद्यार्थ्यांना ताटकळत एस टी .बसची प्रतीक्षा करावी लागली. ही परिस्थिती समता युवा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष निलेश अंबादे व गोलू वाघरे याना माहीत होताच यांनी नवीन बसस्थानक परिसरात जाऊन बसची वाट बघणाऱ्या विद्यार्थ्यांना पाण्याच्या बाटल्या वाटप करून विद्यार्थ्यांची तहान भागविली. रात्रौ साडेसात ते आठ वाजता उशिरा बस उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना घरी जावे लागले

Post a Comment

Previous Post Next Post