नेशील नेशील फटफटिने दारू.. सापडलास तर सांगतेस कोणाला?


मोटारसायकलवर विदेशी दारू वाहून नेताना पकडले

गोंदिया : शहरातील बाजपाई चौकात मोटारसायकलवरून दारू वाहून नेताना गोंदिया शहर पोलिसांनी पकडले. ही कारवाई ८ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता करण्यात आली. डिलेश्वर नीलाराम चौधरी (२३) रा. चुलोद असे आरोपीचे नाव आहे. तो आपल्या मोटारसायकल एमएच ३५ डब्ल्यू ५८७५ वर ७ हजार ३२० रुपये किमतीची विदेशी दारू वाहून नेत असताना पोलीस शिपाई सुमित जांगळे यांनी पकडले. या कारवाईत ४७ हजार ३२० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. गोंदिया शहर पोलिसांनी आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ ई ७७ अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस हवालदार शालीकराम रहांगडाले करीत आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post