लग्नाच्या ९ महिन्यानंतरही बायकोचा सेक्सला नकार; अन्


बंगळुरू : कर्नाटकातील बंगळुरूतुन एक हैराण करणारी घटना समोर आली आहे.येथे पत्नीने सेक्स करण्यास नकार दिल्याप्रकरणी नवर्याने तिची हत्या केली.हत्या केल्यानंतर मृतदेह ठिकाण्यावर लावण्यासाठी शिराडी घाटाच्या दरीत फेकुन आला.यानंतर नवरा थेट पोलीस ठाण्यात गेला आणि बायको बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

मिळालेल्या माहितीनुसार,ही व्यक्ती बिहार येथे राहणारा असुन बंगळुरूमध्ये इलेक्ट्रीशियनचं काम करीत होता.आरोपीने 9 महिन्यांपुर्वी ज्योती कुमारीसोबत लग्न केलं होतं.आरोपीने पोलिसांच्या चौकशीत सांगितलं की,तो पत्नीवर नाराज होता.लग्नाच्या वेळी पत्नीने तिच्या वयाबाबत चुकीची माहिती दिली होती.

लग्नानंतर सेक्स करण्यास नकार…
त्याने पोलिसांना सांगितलं की,पत्नी त्याला असभ्य म्हणत आणि शरीर संबंधात नकार देत होती.पत्नीने कुटुंबीयांना तिचं वय 28 वर्षे असल्याचं सांगितलं होतं.मात्र मुळात ती पतीपेक्षा 10 वर्षांनी मोठी असुन तिचं वय 38 वर्षे आहे.ती कधीच सेक्स करण्यास तयार नव्हती आणि त्याला आणि घरच्यांना असभ्य म्हणत असे.



पोलिसांनी पुढे सांगितलं की,रागाच्या भरात त्याने ज्योतीच्या खुनाचा प्लान रचला.यासाठी त्याने आपल्या मित्रालाही बिहारहुन बोलावलं.3 ऑगस्ट रोजी त्यांनी ज्योतीची गळा आवळुन तिची हत्या केली आणि नंतर तिला मृतदेह दरीत फेकून दिला.यानंतर दुसऱ्याच दिवशी पोलिसांकडे बायको बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली

Post a Comment

Previous Post Next Post