हा पठ्या ४ पोराच्या आईसोबत गुलुगूलु करायचा; विवाहित महिलेसह तरूणाची काढली गावातुन धिंड...


खगरीया : देशभरात विवाहबाह्य संबंधांच्या प्रकरणामध्ये खुप मोठी वाढ होत चालली आहे.याच संबंधांमुळे आता लाखो कुटूंब उद्ध्वस्त होतातय.या वाढत्या प्रकरणामुळे विवाहित महिलेच्या चारीत्र्यावर संशय घेणारी प्रकरणेही वाढली आहेत.अशाच एका संशयाच्या प्रकरणात ग्रामस्थांनी मिळुन गावातील विवाहीत महिला आणि तरूणांची धिंड काढल्याची घटना समोर आली आहे.या प्रकरणाचा video देखील व्हायरल होत आहे.



गावातील महिलेच्या घरी ती एकटी असताना एक तरूण आला होता.गावातील काही गावगुंडाना या घटनेची माहिती मिळताच महिलेच्या घरावर धाड टाकत दोघांना घराबाहेर काढले.तरूणाचे संपुर्ण कपडे उतरवुन विवाहित महिलेस त्यांची गावभर धिंड काढण्यात आली.या घटनेनंतर दोघांनाही गावातल्या एका मध्यभागी बसवण्यात आले.

यानंतर तरूणाचे गावगुंडानी अर्धटक्कल केलं.तसेच या दोघांनाही गावगुंडांकडुन बेदम मारहाण करत अश्लील शिवीगाळही करण्यात आली.या संदर्भातला video देखील व्हायरल केला.विवाहित महिलेने दिलेल्या माहितीनुसार,गावगुंडांनी मारहाण केल्यानंतर तिच्या पतीच्या मित्राला अर्धनग्न केले आणि त्याचं अर्धटक्कल करून त्याला गावात फिरवले.इतकं करून सुद्धा त्यांचं मन भरले नसल्याने त्यांनी त्याला बेदम मारहाण केली.
दरम्यान तिच्यावर अनैतिक संबंधाचा आरोप करण्यात आल्याचे ती सांगते.याप्रकरणी भरतखंड पोलिसांनी सांगितले कि,याप्रकरणी एका युवकाला आधीच अटक करण्यात आली होती,तर दुसऱ्याला रात्री उशिरा अटक करण्यात आली.उर्वरित ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल.

Post a Comment

Previous Post Next Post