शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १५ हजार रुपये बोनस

नागपूर : धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १५ हजार रुपये (सरासरी अंदाजे 500 प्रती क्विंटल) बोनस देण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात याची घोषणा केली.

मुख्यमंत्री म्हणाले, धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १५ हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. दोन हेक्टरी प्रोत्साहनपर हा बोनस दिला जात आहे. शासनाच्या या घोषणाचा फायदा ५ लाख शेतकऱ्यांना होणार आहे.


मुख्यमंत्र्यांनी विदर्भासाठी केलेल्या महत्वाच्या घोषणा –

 

धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १५ हजारांचा बोनस जाहीर.
नागपूर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-१ ला सुधारित ९२७९ कोटींच्या सुधारित खर्चास मान्यता मिळाली आहे.
वडसा देसाईगंज-गडचिरोली नवीन रेल्वे मार्गासाठी १ हजार ९६ कोटी इतक्या सुधारित खर्चास मान्यता. त्यानुसार ५४८ कोटी राज्य शासनाचा हिस्सा आहे.
गोसीखुर्द येथे १०० एकर जागेवर जागतिक दर्जाचा जल पर्यटन प्रकल्प उभारला जाणार आहे. यासाठी जागतिक निविदा मागवण्यात येणार असून, पीपीपी तत्वावर काम करण्यात येईल.
गडचिरोली जिल्ह्यात २० हजार कोटी गुंतवणुकीचा खनिज उत्खनन प्रकल्प सुरू होणार.
सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी ७५५ कोटी रुपये निधी वितरित.
अमरावती, नागपूर पुणे विभागातील १४ जिल्ह्यांतील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना २२२ कोटी ३२ लाख रुपये वितरित.
विदर्भ, मराठवाडामधील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी ७० हजार कोटीच्या रुपयांच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता. त्यापैकी विदर्भामध्ये एकूण ४४ हजार १२३ कोटी रुपयांची गुंतवणूक. ४५ हजार रोजगार निर्मिती होणार.
विदर्भातील राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ सिंदखेडराजा आणि लोणार सरोवर पर्यटन विकास आराखड्यानुसार कामं सुरु आहेत. लोणार सरोवराच्या पर्यटनाच्यादृष्टीने विकास करण्यासाठी ३६९ कोटी ७८ लाख रुपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी.बुलढाणा जिल्ह्यातील अरकचेरी आणि आलेवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पांना सुधारित मान्यता, यामुळे सुमारे १९१८ हेक्टर जमिनीला सिंचनाचा फायदा होईल

Post a Comment

Previous Post Next Post