आमदार मुर्दाबाद! मतदार जिंदाबाद...

आमदार मुर्दाबाद! मतदार जिंदाबाद!!


माजलेल्या जनता पक्षाचा मोर्चा येत होता.एक बैनर बनवून त्यावर बिलावर भुट्टोचा फोटो होता.काही लोक चपलेने मारत होते.काही घोषणा देत होते.
बिलावर भुट्टो मुर्दाबाद
हिंदुस्तान जिंदाबाद.
रिपीट तेच...
त्या बैनर ला आग लावली.जोरात घोषणाबाजी झाली.फोटोग्राफर आले.फोटो साठी दाटीवाटी,ढकला ढकली सुरू झाली.
पत्रकार.‌‌..हा मोर्चा कशासाठी होता?
आमदार..बिलावर भुट्टोचा निषेध केला.
पत्रकार.. कशाबद्दल?
आमदार..त्यांनी भारताबद्दल चुकीचे वक्तव्य केले म्हणून.
पत्रकार..कोण आहेत बिलावर भुट्टो?
आमदार..ते माहीत नाही
पत्रकार.. नक्की कोण आहेत? आमदार, खासदार कि दारू दुकानदार?
आमदार...हो,तेच ते. दारू दुकानदार असू शकतात.
पत्रकार...नेमके काय बोलले ते?
आमदार.. काहीतरी शिवीगाळ केली,एका गिऱ्हाईकाला.आणि बेवडा म्हटले.
पत्रकार... आमदार साहेब, तुमच्या दुकानावर तुम्ही असे शिवीगाळ केली तर काय केले पाहिजे?
आमदार...(पत्रकाराला पांचशे रूपये दाखवत) असे प्रश्न विचारून मला अडचणीत आणू नकोस.
तिकडून एका जखमी माणसाला तिरडीवर झोपवून काही लोक दवाखान्यात नेत होते.आमदारांनी त्यांना थांबवून त्यांची विचारपूस केली.
आमदार...‌‌काय झाले,या माणसाला?
खांदेकरी.‌‌..साहेब, जळगाव शहरातील रस्त्यांवर भयंकर खड्डे आहेत.खड्डा टाळता टाळता हे खड्ड्यात जाऊन पडले.हात पाय मोडले.डोके फुटले.आता दवाखान्यात नेत आहोत.
आमदार.‌.मित्रांनो,मी तुमच्या दुखात सहभागी आहे.( खिशातून पांचशे रूपये काढून दाखवत)हे घ्या पैसे.चांगल्या दवाखान्यात न्या.दुरूस्त करा.
खांदेकरी...नको .आहेत पैसे.आमच्या आमदाराने निवडणूक वेळी मताचे दिले आहेत.त्यातून दवाखान्याचे बील भरू.कमी पडले तर तुम्हाला भेटतो.
आमदार...अरे!मीच तो आमदार आहे.मीच दिलेले आहेत,ते पैसे.
खांदेकरी.‌‌..म्हणून तुम्ही रस्ते बनवले नाहीत.रस्त्याचे पैसे परस्पर हजम केलेत.हा माणूस आता कायमचा अपंग झाला आहे.खरे म्हणजे या माणसाच्या अपघाताला तुम्हीच जबाबदार आहात.
पेशंट....अरे!मला राहू येथेच.आधी या आमदाराला दवाखान्यात पोहचवा.
  खांदेकरी लोक पेशंटला तेथेच टाकून त्या आमदाराला तिरडीवर टाकतात.म्हणतात.
राम बोलो,भैला.
राम बोलो भैला.
आमदार मुर्दाबाद
मतदार जिंदाबाद. 
अशा घोषणा देत निघून जातात.
पत्रकार त्यांना थोडे अडवून फोटो काढतो व बोलतो.
पत्रकार...‌‌या ठिकाणी मतदारांनी जखमी पेशंट ला जागेवरच सोडून रस्ते न बनवणाऱ्या आमदारालाच दवाखान्यात नेलेले आहे.
 (खांदेकरी काकाकडे पाहात) 
पत्रकार....सांगा काका,या घटनेकडे तुम्ही कसे पाहात? तुम्हाला काय म्हणायचे आहे?
खांदेकरी ....जेंव्हा मतदाराला जाग येते.
            आमदाराला स्मशानात पोहचवते.
आता बोला 
मतदार जिंदाबाद
आमदार मुर्दाबाद. 
तो पत्रकार त्या पेशंटला बगलेत हात घालून दवाखान्यात नेतो.

..‌शिवराम पाटील,
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

Post a Comment

Previous Post Next Post