देसाईगंज येथे तीक्ष्ण शस्त्राने वार करून इसमाची हत्या


देसाईगंज : येथून एक किमी अंतरावर अर्जुनी मोरगाव रेल्वे पटरीलगत एका इसमाचा मृतदेह सोमवारी दुपारी ३ वाजता आढळून आला. त्याची तीक्ष्ण वस्तूने हत्या करण्यात आली.

अरुण संपत कोवे (५३) रा. शिवाजी वॉर्ड देसाईगंज असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपीने अरुणची एखाद्या तीक्ष्ण वस्तूने हत्या केली असावी. त्यानंतर त्याचा मृतदेह रेल्वे पटरीजवळ आणून टाकला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भादंवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. घरगुती कारणातून त्याची हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.


Post a Comment

Previous Post Next Post