पतीने दोन मित्रांसोबत पत्नीला शय्यासोबत करण्यास पाडले भाग

बेंगळुरू:- बायकोचे अन्य कुठे अनैतिक संबंध असले की नवऱ्याला ते अजिबात सहन होत नाही. तो तिला असे संबंध तोडण्यास सांगतो तिने न ऐकल्यास परिणामी तो तिचा खून करण्यास देखील घाबरत नाही. नवऱ्याच्या हातून अनेक खून हे बायकोचे अनैतिक संबंध कळल्यावरच झाल्याचे बाहेर येते. पण कर्नाटक राज्याच्या बेंगळुरू येथे एका पतीने आपल्या पत्नीला त्याच्या दोन मित्रांसोबत शय्यासोबत करण्यास भाग पाडले. त्या क्षणाचा व्हिडीओ बनवुन मग तो तिला ब्लॅकमेल करू लागला. तो तिच्या समोर जी अट ठेवत होता ती फारच भयानक होती.

                   पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार त्यांच्या कडे सानिथांद्रा येथील एका खाजगी कंपनीत 34 महिलेने तक्रार केली की तिचा 36 वर्षीय पतीने तिला त्याच्या दोन मित्रांसोबत शय्यासोबत करण्यास भाग पाडले आहे. त्यांचे सन 2011 मध्ये लग्न झाले होते. पतीला दारूचे व्यसन होते. त्यांना एक मुलगा देखील आहे. सन2015 मध्ये तिच्या पतीने तिच्या समोर त्याच्या दोन मित्रांसोबत शय्यासोबत करण्यासाठी तगादा लावला. तिने यासाठी नकार दिला तर तो तिला अमानुष मारहाण करीत होता. पतीच्या हिंसाचार सहन न झाल्याने तिला त्यासाठी राजी व्हावे लागले. 

त्याने बायकोच्या त्या क्षणाचा बनवला व्हिडीओ– तीला नाईलाजाने हे सगळे करावे लागत होते. पत्नी मित्रांसोबत शारीरिक संबंध बनवत असतानाचे क्षणाचा त्याने तिच्या नकळत व्हिडीओ बनवला. काही वेळेनंतर तिने त्या गलिच्छ कामासाठी नकार दिला आणि तिने पतीला घटस्फोट मागितला. त्यामुळे पती चिढला आणि तो तिला ते व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला.

त्याने तिच्यासमोर ठेवली ही अट – तो इतक्यावरच थांबला नाही तर त्याची साळी जी एका खाजगी कंपनीत काम।करीत होती. आणि त्यांच्या इथेच राहत होती तिला त्याच्या सोबत झोपण्यास सांग असे तिला सांगत होता. 

पतीने दिलेल्या धमकीला घाबरून तिने पोलिसात घेतली धाव – 4 डिसेंबरला तिने त्याला पुन्हा घटस्फोट मगितला. तेव्हा त्याने तो व्हिडीओ आणि फोटो तिच्या मोबाईल वर पाठवून तिने त्याचे ऐकले नाही तर तो ते व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर अपलोड करेल आणि तिच्या पालकांना आणि मित्रमैत्रिणींना पाठवेल अशी धमकी दिली. त्यामुळे पाणी डोज्यावरून जात असल्याने तिने पोलिसात धाव घेतली. 

Post a Comment

Previous Post Next Post