ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक शांततेत पार पाडण्याकरिता पोलिसांचे पथ संचालन



गुनेश काटगाये प्रतिनिधि 

केशोरी:- पोलीस स्टेशन केशोरी अंतर्गत ग्राम केशोरी येथे आगामी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक शांततेत पार पडावे, परीसरातील जनतेमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी या करीता केशोरी पोलीस स्टेशन च्या वतीने मा. पोलीस अधिक्षक गोंदिया श्री निखील पिंगळे साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी श्री अशोक बनकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी श्री. संकेत देवळेकर साहेब यांच्या उपस्थीतीत गावातुन मुख्य रस्त्याने बाजार चौक, बिरसा मुंडा चौक, डॉ. आंबेडकर चौक, मश्जीत चौक असा रूट मार्च काढण्यात आले तसेच शिवाजी चौक येथे नागरिकांच्या उपस्थीतीत दंगाका योजने अंतर्गत दंगा नियंत्रणा बाबत सराव घेण्यात आला. यावेळी ठाणेदार पोनि. विलास नाळे सा., सपोनि. शेख सा., तसेच एसआरपीफ ग्रुप क्रमांक १५ चे पोनि. मडावी सा. हजर होते. सदर रूट मार्च व दंगा काबु योजनेच्या सरावात पोलीस स्टेशन केशोरी, आय. आर. बी. गट १५ चे पोलीस अंमलदार हजर होते. सदर सरावाचे प्रात्यक्षीकाचे सादरीकरण झाल्याने गावक-यांमध्ये पोलीसांप्रती विश्वासाची व सुरक्षिततेची भावणा निर्माण झालेली आहे.


विलास नाळे पोलीस निरिक्षक

पोलीस स्टेशन केशोरी

Post a Comment

Previous Post Next Post