झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

गडचिरोली, १० डिसेंबर :- जिल्ह्यातील अहेरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आलापल्ली जवळील नाल्याच्या काठावर एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. याची माहिती मिळताच अहेरीचे पोलीस निरीक्षक किशोर मानभाव आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद बोंडसे आपल्या चमुसह घटनास्थळी दाखल झाले.

आलापल्ली ते सिरोंचाकडे जाताना रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या जंगल परिसरात अज्ञात इसमाचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत असल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच मृतदेह पाहण्यासाठी जवळपासच्या अहेरी, नागेपल्ली आणि आलापल्ली येथील नागरिकांनी एकच गर्दी केली.

रस्त्याच्या कडेलाच एका येनाच्या झाडाला मृतदेह लटकलेल्या अवस्थेत असून मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आहे. त्याच झाडाखाली चप्पल आणि आणखी एक दोरी निदर्शनास आले. सध्यातरी मृतदेहाची ओळख पटली नसून अहेरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून मोका पंचनामा सुरू केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post