दोन जुळ्या बहिणीनी केला एकाच तरुणासोबत विवाह

अकलूज: मुंबई येथील दोन जुळ्या आयटी इंजिनियर मुलींनी एकाच मांडवात एका तरुणासोबत अनोखा विवाह केल्याची घटना माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे घडली . हा नवरदेव माळशिरस तालुक्यातील असून याचा मुंबई येथे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे . कांदिवली येथील आयटी इंजिनियरिंग करून गलेलठ्ठ पगार मिळवणाऱ्या पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणी असून लहानपणापासून त्या एकत्रच वाढल्या आहेत. त्यांना बालपणापासून मरेपर्यंत एकत्र राहायचे असल्याने त्यांनी एकाच तरुणाशी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता .



पिंकी आणि रिंकी दोघी जुळ्या असल्याने दिसायलाही एकसारख्याच आहेत. लहानपणापासून एकत्रच राहिल्याने आपण लग्न करून एकाच घरी जायचे, हे दोघींनीही ठरवले होते. त्यामुळे आपण एकाच तरुणाशी लग्न करायचे, या दोघींनी फार आधीपासूनच ठरवले होते. अखेर त्याच्या कुटुंबाने या विवाहास मान्यता दिली होती . काल अकलूज वेळापूर रोडवरील गलांडे हॉटेल येथे हा अनोखा विवाह संपन्न झाला .
!

मुलाचा माळशिरस तालुक्यातील असणाऱ्या अतुल या तरुणाचा या कुटुंबाशी संबंध आला. या मुलींच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्यानंतर या मुली आईसोबत राहत होत्या . एकदा या कुटुंबातील आई व दोन मुली आजारी पडल्यावर अतुल याच्या गाडीतून त्या दवाखान्यात जात असत . याचवेळी अतुल आणि या दोन तरुणींचा संपर्क वाढत गेला. अखेर काल अतुल याने पिंकी आणि रिंकी या दोन्ही तरुणींशी एकाच मांडवात विवाह केला. या अनोख्या विवाहाला दोन्हीकडील जवळपास ३०० पाहुणे मंडळी लग्नासाठी गलांडे हॉटेलमध्ये जमले होते. अतिशय थाटात झालेल्या या विवाहाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर याची सर्वत्र चर्चा सुरु झाली.

Post a Comment

Previous Post Next Post