जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजन नावाखाली शिक्षकांची 200 ,500 रू लुटमार

आरमोरी:-गडचिरोली जिल्हा परिषद अंतर्गत दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांचे केंद्रस्तरीय,तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय क्रीडा सम्मेलन पार पडायचे सोबतच अधिकारी, कर्मचारी यांचे सुध्दा क्रीडा सम्मेलन पार पडायचे.परंतू मागील कोरोना महामारीमुळे हे क्रीडा सम्मेलन दोन वर्ष होवू शकले नाही.परंतु यावर्षी केंद्र,तालुका, जिल्हा स्तरीय क्रीडा सम्मेलन विद्यार्यांचे न होता.केवळ अधिकारी,कर्मचारी यांचेच होत आहेत ही नवलाचीच बाब आहे.प्राप्त माहितीनुसार सदर क्रिडा सम्मेलन दिनांक ,१९/०१/२०२३ ते२१/०१/२०२३ दरम्यान असल्याचे कळते.विशेष म्हणजे या क्रीडा सम्मेलनात जिल्हा परिषद पदाधिकारी सुध्दा सहभागी असायचे.परंतू त्यांचा कार्यकाल संपुष्टात आल्यामुळे जिल्हा परिषद पदाधिकारी यावर्षी या क्रीडा सम्मेलनात समाविष्ट नाहीत.



महत्वाची बाब अशी कि ह्या क्रिडा सम्मेलनाचा जेवणाचा,निवासाचा सर्व खर्च जिल्हा परिषद अंतर्गत असतो.परंतु आरमोरी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा.नरेंद्र कोकुडे यांनी जिल्हा स्तरीय क्रिडा सम्मेलनाची फी म्हणून तालुक्यातील सर्व शिक्षकाकडून प्रती २००/-रूपये व केंद्रप्रमुखाकडून ५००/-रुपये वर्गणी जमा करण्याची अधिक्रुत माहिती प्राप्त झालेली आहे. आरमोरी तालुक्याच ऐवढी मोठी शिक्षक संख्या आणि २००/-रु.प्रती रक्कम किती जमा होतो.आणि हे कशासाठी हा एक अनुरुत्तीत प्रश्नच आहे.आणि या वर्गणीचा कुठला लेखापरीक्षण किंवा हिशेब नसतो.संबधित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून हा लपंडाव खेळला जात असल्याची चर्चा शिक्षक संवर्गात दबक्या आवाजात होत आहे.तरी याची रीतसर चौकशी होवून भ्रष्टाचार थांबविण्याची गुपीत चर्चा सुरू आहे.

जिल्हास्तरीय अधिकारी/कर्मचारी क्रीडा स्पर्धेकरीता तालुकास्तरीय शिक्षक संघटनांशी चर्चा करून व वरिष्ठांच्या सूचनेनुसार तालुकास्तरीय सहभागी अधिकारी/कर्मचारी यांचे ड्रेस, खेळ साहित्य व इतर सुविधांकरीता निधी जमा करण्यात येत आहे.- गटशिक्षणाधिकारी मा.नरेंद्र कोकुडे 

Post a Comment

Previous Post Next Post