जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय खैरगांव येथे 74 वा प्रजासत्ताक दिन जल्लोषात संस्थेचे सचिव तथा प्राचार्य अनिल साठोने यांच्या हस्ते ध्वजारोहन




राजेंद्र बागडे नागपूर विभागीय प्रतिनिधी ता. 26



   स्थानिक खैरगांव येथे जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय खैरगांव येथे 74 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी खैरगांव ग्रामपंचायत येथे सरपंचा सौ करुणा रविंद्र चौधरी, महात्मा गांधी परिसरातील ध्वजारोहन खैरगांव येथील माजी सैनिक लक्ष्मण पाटणकर, जनता सायन्स कनिष्ठ महाविद्यालय व शिवकृपा स्टार कॉन्व्हेंट येथे सेवादल एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा प्राचार्य अनिल साठोने, तर जनता हायस्कूल येथे इयत्ता 12 मधून प्रथम आलेली निकिता सुनिल बानाईत यांचे पालक सुनिल बानाईत यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. मान्यवरानी भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डाँ, बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्रवीर महात्मा गांधी यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून पूजा करण्यात आली जनता हायस्कूलच्या एन. सी.सी. कॅडेट च्या विध्यार्थीनी पाहुण्याना मानवंदना दिली. यावेळी थोर विभूती महापुरुषाचा जयघोष करण्यात आला. या कार्यक्रमाला गावातील मान्यवर नागरिक, शाळेतील कर्मचारी, विध्यार्थी, मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहुण्याना चहा नास्ता व विध्यार्थीना खाऊ वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post