पोलीस गणेश कांबळे म्हणतो माझी तक्रार एस.पी.कडे करा.



अनुप मेश्राम. प्रतिनीधी....

गडचिरोली :- शहरातील महात्मा फुले वार्ड क्रमांक दोन मध्ये वास्तव्य करणारी, व वार्डात प्रतिष्ठेने जगणारी माजी नगरसेविका विमलताई मेश्राम, या महिलेवर आओ गॅंग मधील गुन्हेगार प्रवृत्तीच्या काव्या पवन रायपुरे यांनी दिनांक 04.01.2023 ला सुमारे पाच ते साडे पाच च्या दरम्यान,काव्या पवन रायपुरे यांनी दगडफेक करून व अशिल्ल शिवीगाळ करून व घरात घुसून दगडाने मारण्याचा प्रयत्न केला.आणि तुला जिवंत मारल्याशिवाय राहणार नाही अशी धमकी सुद्धा दिली. विमलताई मेश्राम या महिलेने काव्या पवन रायपुरे व त्यांच्या साथीदारांच्या नावाने गडचिरोली पोलीस स्टेशनला लेखी तक्रार सुद्धा दिली. सदर प्रकरणाची चोकशी गडचिरोलीचे पोलीस गणेश कांबडे यांचा कडे दिली. 

गणेश कांबडे यांनी गडचिरोली शहरातील पोलीस पाटील यांचे घरी जाऊन व. त्यांच्या सोबत हित संबंध प्रस्तापित करून,विमलताई मेश्राम यांची आतापर्यंत कुठलीही चोकशी न करता गणेश कांबडे आऊ गँगवार मधील गुन्हेगारांना अभय देण्याचा प्रयत्न करीत आहे.घटित प्रकरणाबद्दल पोलीस गणेश कांबडे यांना विचारणा केली असता तूम्ही माझे नावाने पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करा असे उद्धट उत्तर देऊन गणेश कांबडे यांनी आपली बाहादुरी दाखविली आहे.पोलीस गणेश कांबडे यांची त्वरित हकालपट्टी करून गणेश कांबडे यांना त्वरित हटवून त्यांची बदली सिरोंचा, भामरागड येथे करण्याची मागणी पत्रकार अनुप मेश्राम यांनी केली सदर प्रकरणाची चोकशी दुसऱ्याकडे देण्यात यावी.

Post a Comment

Previous Post Next Post